मुंबई, पुण्याहून अमरावती, नागपूरकडे जाणाऱ्या गाडय़ा ३० ऑक्टोबपर्यंत स्थगित

मुंबई : मध्य रेल्वेने बडनेरा येथे तांत्रिक कामांसाठी गुरुवारपासून दोन दिवसांचा ब्लॉक घेतला असून त्यामुळे मुंबई, पुणे येथून नागपूर, अमरावतीकडे जाणाऱ्या काही गाडय़ा ३० ऑक्टोबपर्यंत रद्द  करण्यात आल्या आहेत. अचानक गाडय़ा रद्द झाल्याने तीन महिने आधी आरक्षण  केलेले  प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत.

गाडी क्रमांक ०२१११ सीएसएमटी ते अमरावती एक्स्प्रेस, तर ०२११२ अमरावती ते सीएसएमटी गाडी गुरुवारी  आणि शुक्र वारीही रद्द के ली. तर पुणे-अमरावती-पुणे, सीएसएमटी ते नागपूर ते सीएसएमटी दुरान्तो एक्स्प्रेस, पुणे ते नागपूर ते पुणे या मार्गावरील गाडय़ाही २९ आणि ३० ऑक्टोबरला रद्द करण्यात आल्या आहेत. अमरावती-सुरत धावणारी गाडी क्र मांक ०९१२५ आणि ०९१२६ भुसावळपासून सुटणार आहे. अहमदाबाद-नागपूर-अहमदाबाद गाडी भुसावळ, इटारसी, नागपूरमार्गे चालवण्यात आल्या. प्रवाशांना २७ ऑक्टोबरला याची माहिती देण्यात आली. गाडय़ा अचानक रद्द झाल्याचा संदेश प्रवाशांच्या भ्रमणध्वनीवर आल्यानंतर त्यांची तारांबळ उडाली.  

मुंबईत सरकारी कार्यालयात काम करणारे अनिल शहापुरे दिवाळीनिमित्त २९ ऑक्टोबरला अमरावतीला जाणार होते. त्यासाठी त्यांनी सीएसएमटी-अमरावती एक्स्प्रेसचे आरक्षण जुलैमध्ये केले होते.  कु टुंबीय अमरावतीला असल्याने त्यांच्यासह दिवाळी साजरी करण्यासाठी  आरक्षण केले होते. गाडी रद्द के ल्याने गैरसोय झाल्याचे शहापुरे यांनी सांगितले.

मुंबईत मंत्रालयात काम करणारे श्रीराम रोकडे यांनीही दिवाळीसाठी २९ ऑक्टोबरच्या मुंबई-नागपूर दुरान्तो गाडीचे आरक्षण दोन महिने आधी के ले होते. परंतु ही गाडी रद्द झाल्याचे कळल्यावर आता नागपूरला दिवाळी साजरी करण्यासाठी जाणार कसे असा प्रश्न पडल्याचे रोकडे म्हणाले. 

भुसावळ विभागात रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी ब्लॉक घेण्यात आला. त्यासाठी काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या. परंतु याच मार्गावर अन्य विशेष गाडय़ाही सोडल्या आहेत. ज्यांचे आरक्षण रद्द झाले त्यांना तिकिटांचा परतावाही त्वरित मिळणार आहे.

– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे