मुंबईः भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी गृहविभागाकडून काढण्यात आले असून त्यात मुंबईला तीन नवे उपायुक्त मिळाले आहेत. पंकज देशमुख, निमित गोयल, सुधाकर बी. पाठारे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. मुंबईतील उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर उपायुक्तपदी, तर राजतिलक रौशन यांची सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य या पदावर बदली करण्यात आली आहे. हेही वाचा - मुंबई : गणेशोत्सवानिमित्त ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील फेऱ्यांमध्ये वाढ; २० अतिरिक्त फेऱ्या हेही वाचा - अंधेरीतील गोखले रेल्वे उड्डाणपुलाची दुसरी तुळई बसवण्याच्या कामाला सुरुवात याशिवाय संदीप गिल्ल यांची पुणे ग्रामीण अधीक्षक, विजय चव्हाण यांची पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या (सोलापूर) प्राचार्यपदी बदली करण्यात आली आहे. तसेच भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची पोलीस उपायुक्त नागपूर शहर, रोहिदास पवार यांची पुणे लोहमार्ग अधीक्षक, लक्ष्मीकांत पाटील यांची सायबर सुरक्षा अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. याशिवाय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ८ अधिकाऱ्यांना तसेच कनिष्ठ श्रेणीतील ८ भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांनाही नियुक्ती देण्यात आली आहे.