मुंबई : मुंबई पोलीस दलात कर्यरत २५० पोलीस निरीक्षकांसह १०६ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. याबाबतचे आदेश शनिवारी जारी करण्यात आले. याशिवाय, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपअधीक्षक पदावर बढती मिळालेल्या आठ अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले असून दक्षिण प्रादेशिक विभाग येथे कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्यासह २० अधिकाऱ्यांचा बढतीसाठी पात्र अधिकाऱ्यांच्या निवडसूचीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप आणि तक्रार करणाऱ्या पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांची गावदेवी पोलीस ठाण्यातून भायखळा पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. तर, पोलीस निरीक्षकांच्या करण्यात आलेल्या अन्य बदल्यांमध्ये सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे अशा तीन अधिकाऱ्यांची गुन्हे शाखेत नेमणूक करण्यात आली. तसेच, वडाळा टी टी पोलीस ठाण्यातील संदीप बडगुजर यांच्यासह एकूण २० अधिकाऱ्यांची वाहतूक विभागात नियुक्ती करण्यात आली.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
bjp candidate for lok sabha election in pune will be decided by party workers
पुण्यात भाजपाचा उमेदवार पदाधिकाऱ्यांकडून होणार निश्चित
Demolition of Shiv flyover delayed again due to examinations Mumbai
मुंबई: परीक्षांमुळे शीव उड्डाणपुलाचे पाडकाम पुन्हा लांबणीवर
Chahal, Bhide to be transferred after ECI orders
चहल, भिडे यांची बदली अटळ; राज्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली

नुकत्याच झालेल्या वंचित बहुजन आघाडीतील दोन पदाधिकाऱ्यांवरील हल्ल्याचा तपास करत असलेल्या भोईवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संजय निकम यांची मलबार हिल पोलीस ठाणे, वडाळा टी टी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांची सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे, गोवंडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक तुकाराम कोयंडे यांची एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली.

यलोगेट पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक महेश पाटणकर यांची दादर पोलीस ठाणे आणि ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्यातील महिला पोलीस निरीक्षक प्रभा राऊळ यांची संरक्षण आणि सुरक्षा विभागात नेमणूक करण्यात आली आहे.