मुंबई : भारतीय पोलीस सेवा व राज्य पोलीस सेवेतील उपायुक्त दर्जाच्या २८ अधिकाऱ्यांच्या बदल्या मंगळवारी गृहविभागाकडून करण्यात आल्या. त्यात ठाणे ग्रामिणच्या दिवाली धाटे यांची मुंबई पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. साताऱ्याचे अधीक्षक समीर शेख यांची मुंबईत उपायुक्त पदावर बदली करण्यात आली आहे.
हेही वाचा – बॉलीवूडची लोकप्रिय पटकथाकार जोडी सलीम – जावेद पुन्हा एकत्र येणार
हेही वाचा – मुंबई : विशेष मोहिमेंतर्गत २२१ ई-बाईक चालकांवर कारवाई, २९० ई-बाईक्स जप्त
याशिवाय नागपूर पोलीस प्रशिक्षण क्रेंद्राचे प्राचार्य लक्ष्मीकांत पाटील यांची पोलीस अधीक्षक सायबर सुरक्षा, मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे. अपर्णा गिते यांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, मुंबईच्या कार्यकारी संचालक (सुरक्षा) या पदावर बदली करण्यात आली आहे. पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या मनिष कलवानिया यांचीही पोलीस उपायुक्त मुंबई पदावर बदली करण्यात आली आहे. याशिवाय विजयकांत सागर यांनाही मुंबईत उपायुक्त म्हणून बदली करण्यात आले आहे. याशिवाय पंकज शिरसाट, अतुल झेंडे या दोघांची ठाणे उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. एकूण २८ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच दिगंबर प्रधान यांच्या बदलीतही आदेशात सुधारणा करून त्यांना नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे.