कचऱ्याचा डोंगर हटवून पर्यटनस्थळाची निर्मिती 

इंद्रायणी नार्वेकर

no international airport pune city marathi news
पुणे : उद्योगांना पूरक पायाभूत सुविधांची बोंब!
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
thieves firing at malkapur railway station
मलकापूर रेल्वेस्थानक परिसरात चोरट्यांचा गोळीबार; पाठलाग करणाऱ्या नागरिकांना…
Gadchiroli Police Arrests Two Female Naxalites One Supporter With Reward of 5 and half Lakhs
साडेपाच लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांना अटक; सी- ६० पथकाची कारवाई

मुंबई : वरळी कोळीवाडय़ाला लागूनच असलेला नरिमन भट जेट्टी हा मुंबईकरांना माहीत नसलेला परिसर पालिकेने सुशोभित करून उजेडात आणला आहे. कचऱ्याचे डोंगर हटवून पालिकेने तेथे आकर्षक असे मनोरंजन मैदान उभारले आहे, तर प्रभादेवी समुद्र किनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी पायवाटही उपलब्ध केली आहे. वरळी कोळीवाडय़ाला लागूनच असलेल्या नरिमन भट जेट्टी परिसर गेल्या काही वर्षांत मुंबईच्या विस्मृतीत गेला होता. एकेकाळी गणपती विसर्जनाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या या जेट्टी परिसराला गेल्या काही वर्षांत कचराभूमीचे स्वरूप आले होते. समुद्रातून वाहून आलेला कचरा साचून, तसेच लोकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे हा परिसर गलिच्छ झाला होता. पालिकेच्या जी दक्षिण विभाग कार्यालयाने या परिसराचे संपूर्ण रुपच पालटले आहे. समुद्रातून वाहून येणारा कचरा अडवण्यासाठी या भागात समुद्रात अडथळे उभारण्यात आले असून निर्माण झालेल्या तब्बल दहा हजार चौरस फूट जागेवर मनोरंजन मैदान उभारण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात स्थानिक लोकांसाठी एक नवीन विरंगुळा केंद्र तयार करण्यात आले आहे.

या जागेवर मुलांना खेळता येईल, विरंगुळा म्हणून बसता येईल. सर्व वयोगटातील लोकांसाठी हे एक विरंगुळा केंद्रच असणार आहे. तसेच हा भाग प्रभादेवीच्या टी बाळू समुद्र किनाऱ्यापर्यंत जोडण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांना या समुद्र किनाऱ्यावरून मनोरंजन मैदानावर जाता येणे शक्य होईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली. पुढच्या टप्प्यात प्रभादेवी समुद्र किनाऱ्याचे सुशोभीकरण करण्याचाही मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

आसपासच्या घरांच्या भिंतीही सुशोभित

कचरा अडवल्यामुळे निर्माण झालेल्या जामिनीवर त्रिमितीय समुद्री जीवन रेखाटण्यात आले आहे. या जागेवर कबड्डी, बास्केट बॉल, वॉली बॉल अशा विविध खेळांसाठीची मैदाने तयार करण्यात आली आहेत. तसेच रोषणाई केल्यामुळे हा परिसर प्रकाशमान झाला आहे. पर्जन्य जलवाहिन्याची जुनी पातमुखे या ठिकाणी असून त्यावर प्रेक्षा गॅलरी तयार करण्यात आली आहे. पर्यटकांना तेथून अथांग समुद्र आणि वरळी-वांद्रे सागरीसेतूचे दर्शन घेता येईल. या संपूर्ण सुशोभीकरण प्रकल्पाला एकसंघता यावी यासाठी आजूबाजूच्या घरांच्या भिंतीवरही समुद्री जीवन रेखाटण्यात आले आहे.