मुंबई:  मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील वीरांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  शनिवारी आदरांजली वाहिली. तसेच त्यांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले.

 मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणातील शहीद स्मारक येथे आयोजित अभिवादन संचलन कार्यक्रमास मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहीद कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या सर्व उपस्थितांनीही पुष्प अर्पण करून शहिदांना अभिवादन केले. यावेळी सर्व मान्यवरांनी उपस्थित शहिदांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सहसंवेदना व्यक्त केली.

Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
cm eknath shinde, cm eknath shinde convoy stopped
रेल्वेने अडविला मुख्यमंत्र्यांचा ताफा
Nashik Lok Sabha
साहेब, जागा वाचवा… – नाशिकच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
Devendra Fadnavis criticizes the disgruntled and dissatisfied leaders of the party
“बसमध्ये जागा मिळाली नाही की बसमागे दगड मारत धावणारे असतात…”, देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले?

 पोलिस बॉइज चॅरीटेबल ट्रस्ट संचलित महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गेट वे ऑफ इंडिया येथे २६/११ च्या हल्ल्यातील शहीद वीरांच्या स्मरणार्थ श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  दहशतवादी हल्ल्या वेळी धाडसी कामगिरी बजावलेल्या पोलीस कर्मचारी, बेस्ट कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.  पोलीस, सुरक्षा कर्मचारी आपले कर्तव्य अविरतपणे बजावत असतात. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपणही समाजात वावरताना अशा प्रकारच्या दहशतवादी कृत्यांबाबत सुरक्षिततेच्या दृष्टीने नेहमी सतर्क राहिले पाहिजे. यानिमित्ताने आपण सर्वजण सदैव सतर्क राहण्याचा निर्धार करूया, असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.