चालकाचा ताबा सुटला, ट्रक थेट कालव्यात; तिघे जागीच ठार

मृतापैकी दोघांची ओळख पटली आहे.

truck accident
सिमेंट घेऊन पुण्याच्या दिशेकडे निघालेला मालट्रक (एमएच ४३ यु ६२८६) सोलापूर पुणे महामार्गावर ड्रायव्हरचा ट्रकवरील ताबा सुटल्याने कालव्याच्या पुलाशेजारी लोखंडी पट्टी तोडून आत कोसळला.

पुणे महामार्गावर भीमानगर (ता. माढा, जि. सोलापूर) येथे पुणेकडे सिमेंट भरून निघालेला मालट्रक सोमवारी पहाटे २. ४५ वाजण्याच्या सुमारास ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुलाच्या जवळील कालव्यात पडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. यातील दोघांची ओळख पटली आहे.
सिमेंट घेऊन पुण्याच्या दिशेकडे निघालेला मालट्रक (एमएच ४३ यु ६२८६) सोलापूर पुणे महामार्गावरील भीमानगर जवळ ड्रायव्हरचा ट्रकवरील ताबा सुटल्याने कालव्याच्या पुलाशेजारी लोखंडी पट्टी तोडून आत कोसळला. ही घटना सोमवारी (दि. १०) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये चालक शिवाजी कांबळे (वय २६ रा. पेठ सांगवी ता. उमरगा, जि. उस्मानाबाद), गौरव रघुनाथ गुणे (वय ३२ रा. शिवळी जि. लातूर) इतर एक अंदाजे ३० वर्षे वयाच्या तरूणाची ओळख अद्याप पटलेली नाही. कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे या तिघांचा जागीच मृत्यू झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Truck accident at bhimanagar three dead

ताज्या बातम्या