मुंबई : अन्न व औषध प्रशासनचे तडफदार राज्य आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुन्हा एकदा स्वतःच्या विभागातील चार बड्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. बेकायदा पद्धतीने छापा टाकणे आणि मालाची नियमबाह्य जप्ती करणे याप्रकरणी या चार अधिकाऱ्यांना मुंढेंनी थेट घरचा रस्ता दाखवला आहे. निलंबित केलेल्या चार अधिकाऱ्यांमध्ये सोलापूरचे दोन अन्नसुरक्षा अधिकारी असून नागपूरचे सहाय्यक आयुक्त आणि पुण्याच्या एका सहआयुक्तांचा समावेश आहे.
अन्न व औषध प्रशासनच्या कारवाया राज्य व देशभर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. मात्र या कारवायांमध्ये अधिकारी मनमानी करत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनचे मंत्री कार्यालय आणि आयुक्त कार्यालय यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी अन्नसाठ्यावर मनमानी पद्धतीने केलेल्या कारवायांमुळे अन्न व औषध प्रशासन विभागाला मुंबई उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागावी लागली होती तसेच अनेक कारवायांवर न्यायालयाने स्थगिती दिली होती.
नागपूरचे सहाय्यक आयुक्त यदुराज दहातोंडे यांनी आणि पुण्याचे सहआयुक्त दिगंबर भोगावडे यांनी ‘एसओएक्स इंडीया प्रा. ली.’ या कंपनीच्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात टाकवे गावी असलेल्या गोदामावर छापा मारला. मात्र त्या संदर्भात वरिष्ठांची परवानगी घेतली नव्हती. दहातोंडे यांनी आपल्या कार्यक्षेत्राबाहेर कारवाई केली होती. तसेच आपण विशेष भरारी पथकात असल्याचे त्यांनी भासवले होते. सहआयुक्त दिगंबर भोगावडे यांनी जप्त उत्पादने अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ अंतर्गत येतात का, याची खातरजमा केली नाही. जप्त उत्पादनांवर न खाण्याची उत्पादने, असे स्पष्ट लिहिले होते. तरीसुद्धा कारवाई केली. नमुना संकलनापुरती कारवाई मर्यादित न ठेवता तिची व्याप्ती वाढवण्यात आली. त्यामुळे कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आणि न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली होती.
अशोक इलागेर आणि च. रा. स्वामी या सोलापूरच्या दोन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा असाच प्रताप आहे. त्यांनी हाय स्ट्रीट इम्पेक्स या ठाण्यातील कंपनीवर छापा मारला होता. त्यांनी स्वतःचे कार्यक्षेत्र सोडून कारवाई केली होती. हुक्कासाठी उपयोग, खाण्यासाठी नाही, असे सदर उत्पादनावर स्पष्ट केलेले होते. तरीसुद्धा त्यांनी ही कारवाई केली. अन्न सुरक्षा व मानके अंतर्गत नमुना येत नसल्यास अशा स्थितीत त्यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन किंवा कायदेशीर सल्ला घ्यायला हवा होता. तसेच नमुना संकलन पुरती कारवाई न करता संपूर्ण माल जप्त केला. ही कारवाई विभागाला मागे घ्यावी लागली आणि मुंबई उच्च न्यायालयात माफी मागावी लागली होती.
२१ अधिकाऱ्यांवर टांगती तलवार :
मागच्या आठवड्यात मालेगाव येथील १० कोटी रुपये किंमतीची जप्त सुगंधित सुपारी नष्ट न करता खोटे पंचनामे केल्याप्रकरणी पाच सहआयुक्तांना निलंबित करण्यात आले होते. त्यामध्ये आता या चार अधिकाऱ्यांची भर पडली आहे. अन्न व औषध प्रशासनचे आणखी २१ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची सध्या विभागीय चौकशी सुरू आहे. यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात विभागातील अधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत
