मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क या दुसऱ्या बोगद्याचे खनन काम पूर्ण झाले आहे. मंगळवारी दुपारी प्रियदर्शनी पार्क येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्याचा ‘ब्रेक थ्रू’ होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारा रस्ता प्रकल्पातील प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतचे बांधकाम वेगात सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत २ महाबोगदे खणण्यात येत आहेत. बोगदे खणण्याच्या कामाला ११ जानेवारी २०२१ रोजी सुरुवात झाली होती. पहिल्या बोगद्याचे खोदकाम १० जानेवारी २०२२ रोजी पूर्ण झाले होते. १ एप्रिल २०२२ पासून दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम सुरू करण्यात आले. दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू असताना झालेल्या यंत्र बिघाडामुळे बोगदा खणण्यास उशीर झाला होता. मात्र आता हे काम पूर्ण झाले आहे.  भारतातील सर्वात मोठ्या ‘मावळा’ या टीबीएम संयंत्राच्या सहाय्याने बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.

megablock
रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे – लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द, काही उशिराने धावणार
pm narendra modi pune visit marathi news, pm modi pune 6 march marathi news,
मोठी बातमी : पुणे मेट्रो रामवाडीपर्यंत ६ मार्चपासून धावणार; पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार
Overcrowding on footbridges at Thane station
ठाणे स्थानकातील पादचारी पुलांवर गर्दीचा महापूर
loksatta analysis adani group wins bid to redevelop bandra reclamation
विश्लेषण : मुंबईच्या पुनर्विकासावर अदानींचा वरचष्मा? धारावीपाठोपाठ वांद्रे रेक्लमेशनही?

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांकडून पावसाळापूर्व तयारीचा आढावा ;धोकादायक इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

या बोगद्याच्या ब्रेक थ्रू कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन, महिला व बालकल्याण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त  श्विनी भिडे आदी उपस्थित राहणार आहेत. मुंबई सागरी किनारा मार्ग’ या प्रकल्पांतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंत महानगरपालिकेतर्फे सागरी किनारा मार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. या मार्गाची  लांबी १०.५८ किलोमीटर आहे.