Premium

मुंबई: सागरी किनारा मार्गातील दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज होणार ब्रेक थ्रू

मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारा रस्ता प्रकल्पातील प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतचे बांधकाम वेगात सुरू आहे.

tunnel work in Mumbai Coastal Road project
सागरी किनारा मार्गातील दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण (संग्रहित छायाचित्र) लोकसत्ता टीम

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क या दुसऱ्या बोगद्याचे खनन काम पूर्ण झाले आहे. मंगळवारी दुपारी प्रियदर्शनी पार्क येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्याचा ‘ब्रेक थ्रू’ होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारा रस्ता प्रकल्पातील प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतचे बांधकाम वेगात सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत २ महाबोगदे खणण्यात येत आहेत. बोगदे खणण्याच्या कामाला ११ जानेवारी २०२१ रोजी सुरुवात झाली होती. पहिल्या बोगद्याचे खोदकाम १० जानेवारी २०२२ रोजी पूर्ण झाले होते. १ एप्रिल २०२२ पासून दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम सुरू करण्यात आले. दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू असताना झालेल्या यंत्र बिघाडामुळे बोगदा खणण्यास उशीर झाला होता. मात्र आता हे काम पूर्ण झाले आहे.  भारतातील सर्वात मोठ्या ‘मावळा’ या टीबीएम संयंत्राच्या सहाय्याने बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांकडून पावसाळापूर्व तयारीचा आढावा ;धोकादायक इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

या बोगद्याच्या ब्रेक थ्रू कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन, महिला व बालकल्याण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त  श्विनी भिडे आदी उपस्थित राहणार आहेत. मुंबई सागरी किनारा मार्ग’ या प्रकल्पांतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंत महानगरपालिकेतर्फे सागरी किनारा मार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. या मार्गाची  लांबी १०.५८ किलोमीटर आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tunnel from priyadarshani park to girgaon chowpatty of coastal road project completed mumbai print news zws

First published on: 30-05-2023 at 13:10 IST
Next Story
नोटाबंदीवरून आरोपप्रत्यारोप, मूर्खपणाचा निर्णय : चिदम्बरम