करोना चाचणी न करताच विमान प्रवासाकडे कल   

चाचण्या केल्यानंतर १ हजार ६१९ देशांतर्गत प्रवासी बाधित आढळले आहेत.

corona
करोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे निर्बंध जरी शिथिल झाले तरी काळजी घेण्यात शिथिलता नको. (प्रातिनिधिक छायाचित्र)

चार महिन्यांत मुंबईत आलेले २५०० प्रवासी बाधित

मुंबई : आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत विमानप्रवासासाठी करोना चाचणी करण्याच्या नियमाला बगल देऊन लक्षणे असतानाही अनेक जण विमान प्रवास करत आहेत. करोना चाचणीचा अहवाल न देणाऱ्या प्रवाशांच्या मुंबई विमानतळावर केलेल्या चाचण्यांमध्ये चार महिन्यात जवळपास अडीच हजार प्रवासी बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. यात प्रामुख्याने देशांतर्गत प्रवासी आहेत.

आखाती देश, युरोप, ब्राझील, दक्षिण आफ्रि का येथून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्याचा नियम डिसेंबर २०२० मध्ये करण्यात आला. इतर देशातून येणाऱ्यांना ७२ तास आधी करोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यानंतरच प्रवासाची मुभा आहे. याशिवाय दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवातूनही येणाऱ्यांनाही प्रवासापूर्वी ७२ तासातील चाचणी अहवाल दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु करोना रुग्णांची वाढत जाणारी संख्या पाहाता जानेवारी २०२१ नंतर विमान प्रवाशांसाठी आणखी कठोर निर्बंध लागू करण्यात आले. त्यानंतर करोना चाचणी व अहवाल तपासणीची अपुरी व्यवस्था तसेच काही प्रवाशांनीही के लेल्या दुर्लक्षामुळे मुंबईत आल्यानंतरच देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी झाली.

जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२१ या महिन्यात मुंबई विमानतळावर आलेल्या २ लाख ६३ हजार ५०९ प्रवाशांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात देशांतर्गत १ लाख ७९ हजार ६९६ प्रवाशांच्या, तर ८३ हजार ८१३ आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या चाचण्यांचा समावेश होता.

चाचण्या केल्यानंतर १ हजार ६१९ देशांतर्गत प्रवासी बाधित आढळले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये बाधितांची संख्या ८११ एवढी आहे. मार्चमध्ये मुंबई विमानतळावर के लेल्या चाचणीत देशांतर्गत ५३१ प्रवाशांना व ३०२ आंतरराष्ट्रीय प्रवाशांना करोनाची लागण झाली असल्याचे दिसून आले.

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेले नियम न पाळणारे किंवा चाचण्या न करताच देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवास करून मुंबईत आलेले प्रवासी येथे के लेल्या चाचणीत बाधित आढळत आहेत. त्यामुळेच शासन व पालिके कडून आणखी कठोर नियमावली करण्यात आली. विमान प्रवाशांनी नियम पाळावे, असे आवाहन सातत्याने करत आहोत. – सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई पालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Turn to air travel without testing the corona virus akp

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या