टीव्ही अभिनेता राहुल दीक्षितची आत्महत्या

त्याने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली हे अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस याचा शोध घेत आहेत.

(प्रतिकात्मक छायाचित्र)
टीव्हीवरील मालिकांमध्ये काम करणाऱ्या राहुल दीक्षित या स्ट्रगलर अभिनेत्याने मुंबईत आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त आहे. एएनआयने यासंदर्भात ट्विट केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

एएनआयच्या वृत्तानुसार, राहुल दीक्षित असे आत्महत्या केलेल्या २८ वर्षीय अभिनेत्याचे नाव असून त्याने अनेक हिंदी मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. बुधवारी सकाळी त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले. त्याने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली हे अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस याचा शोध घेत आहेत. मात्र, तो एक स्ट्रगलर अभिनेता असल्याने नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, यापूर्वी टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकारांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत. बालिका वधू या मालिकेतील मुख्य अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हीने आत्महत्या केली होती. ती आपल्या वैयक्तिक आयुष्याला कंटाळली होती. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री जिया खान हीने देखील आत्महत्या केली होती. अभिनेता सुरज पांचोलीसोबतच्या आपल्या नात्यामुळे ती नैराश्यात गेली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tv actor named rahul dixit allegedly committed suicide early this morning