मुंबई: टीव्हीचा स्फोट झाल्याने घराला लागली आग; थोडक्यात बचावले मायलेक

घरात लागलेल्या या आगीमध्ये कपडे, अंथरुण, पडद्यांसोबत काही वस्तूही जळून खाक झाल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केलीय.

Tv Blast
घरातील अनेक वस्तू जळून खाक झाल्यात

मुंबई कांदिवली पूर्वेतील पोईसर भाजीवाडी चाळीत एक धक्कादायक घटना घडली आहे. या चाळीमधील एका घरात बुधवारी रात्री आठच्या सुमारास एक स्फोट झाला. आश्चर्याची बाब म्हणजे हा स्फोट एका टीव्हीचा होता. एलसीडी टीव्ही चालू असताना अचानक तो फुटला. या स्फोटामुळे चाळीत राहणाऱ्या सर्व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

या घटनेत त्यावेळी घरात असणारी एक महिला आणि तिचा मुलगा थोड्यात बचावले आहेत. टीव्हीचा स्फोट झाल्यानंतर घरामध्ये सर्वत्र आग लागली. घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा टीव्ही सॅमसंग कंपनीचा होता. रात्री आठच्या सुमारास टीव्ही पाहत असतानाच अचानक त्याचा स्फोट झाला आणि घरात आग लागली.

घरात लागलेल्या या आगीमध्ये कपडे, अंथरुण, पडद्यांसोबत काही वस्तूही जळून खाक झाल्या आहेत. घटनेची माहिती समता नगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा आढावा घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tv blast in mumbai mother and child escape unhurt scsg

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी