मुंबईः कांदिवली गोळीबार प्रकरण : दोन आरोपींना गुजरातमधून पकडण्यात गुन्हे शाखेला यश | two accused in Kandivali firing case arrested from Gujarat mumbai print news amy 95 | Loksatta

मुंबईः कांदिवली गोळीबार प्रकरण : दोन आरोपींना गुजरातमधून पकडण्यात गुन्हे शाखेला यश

कांदिवली परिसरात झालेल्या गोळीबाराप्रकरणी दोन संशयीत आरोपींना गुजरातमधून पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले.

मुंबईः कांदिवली गोळीबार प्रकरण : दोन आरोपींना गुजरातमधून पकडण्यात गुन्हे शाखेला यश
( संग्रहित छायचित्र )

कांदिवली परिसरात झालेल्या गोळीबाराप्रकरणी दोन संशयीत आरोपींना गुजरातमधून पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले. गुन्हे शाखेच्या कक्ष-११ च्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व गावठी पिस्तुल हस्तगत केली आहेत. कांदिवली येथे शुक्रवारी रात्री झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता, तर तिघेजण जखमी झाले होते.

हेही वाचा >>> मुंबई : सर्वाधिक खड्ड्यांच्या यादीत मुंबई उपनगर अग्रेसर; या भागातून सर्वाधिक तक्रारी

कांदिवली येथील न्यू लिंक रोड कल्पवृक्ष हाईट्स येथे शुक्रवारी रात्री हा प्रकार झाला होता. त्यात दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी गोळीबार केला. आरोपींनी घटनास्थळी पाच गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारात अंकित यादव याचा मृत्यू झाला होता, तर अविनाश दाभोळकरसह तेथून जाणारे पादचारी गगनपल्ली प्रकाश व मदेशिया दोघे जखमी झाले होते. जखमींवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलीसांनी धाव घेतली. त्यावेळी घटनास्थळी माहिती घेतली असता सोनू पासवान व सूरज गुप्ता या दोघांनी गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले होते. दोघेही कांदिवलीतील लालजीपाडा परिसरातील रहिवासी आहेत. चौकशीत घटनास्थळी सूरज व सोनू दोघांनी येऊन दाभोळकर, तक्रारदार दिनकर पाल व मृत अंकित यांना शिवीगाळ केली. त्यावेळी तिघांनी मिळून सूरज गुप्ताला पकडले. त्यावेळी सोनूने अंधाधुंद गोळीबार केला. त्यात दाभोळकर, अंकित यांच्यासह दोन पादचाऱ्यांनाही गोळी लागली. त्यानंतर दोघेही दुचाकीवर बसून बोरीवलीच्या दिशेने पळून गेले. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी हत्या, हत्येचा प्रयत्न व हत्यार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तपास केला असता आरोपी गुजरात येथी बिलीमोरा येथे बहिणीकडे गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपींनी स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता, दहीहंडीच्या वादातून आरोपींनी गोळीबार केल्याचा संशय आहे. गोळीबारानंतर आरोपींनी घटनास्थळावरून बोरीवलीच्या दिशेने पळ काढला होता. याप्रकरणातील मृत अंकित यांच्याविरोधात कांदिवली पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल होता. याशिवाय जखमी दाभोळकर विरोधातही कांदिवली व चारकोप पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुंबई विमानतळावर सहा कारवायांमध्ये साडे चार कोटींचे सोने जप्त

संबंधित बातम्या

‘मेट्रो ३’ लवकरच मुंबईत धावणार; वाचा कशी ती…
जीएसटीतील घोळामुळे देशाचा हजारो कोटींचा महसूल बुडाला- पृथ्वीराज चव्हाण
आरोग्यमंत्र्यांच्या ‘कृती दला’ची कूर्मगती!
झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील घोटाळ्यास मुख्यमंत्रीच जबाबदार
कृष्णकुंजबाहेर तयार करणार हॉकर्स झोन? पालिकेकडून राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“…तर तुम्ही मूर्ख, खोटारडे आणि ढोंगी आहात” उद्धव ठाकरेंवरील ‘त्या’ आरोपांवरून राऊतांचा भाजपावर घणाघात
पुणे: गडकिल्ले संवर्धनासाठी दोन वर्षांनंतर समित्या स्थापन
पुणे: नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; ट्रकची मालवाहू गाडीला धडक; सात जण जखमी
“आजच्या गद्दारीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली”, उद्धव ठाकरेंचा मंगलप्रभात लोढांसह शिंदेंवर हल्लाबोल
BREAKING: ISIS चा म्होरक्या अबू हसन अल-हशीमी अल-कुरेशीचा युद्धात मृत्यू