मुंबई : चेंबूरच्या शेल कॉलनीत राहणाऱ्या एका पोलीस शिपायाच्या घरात दोन दिवसांपूर्वी आज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. याबाबत नेहरूनगर पोलिसांनी तपास करून घरफोडी करणाऱ्या पती-पत्नीला अटक केली असून, दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अविनाश कांबळे असे या पोलीस शिपायाचे नाव असून, ते शेल कॉलनीतील ९ क्रमांकाच्या इमारतीमध्ये राहतात. १४ फेब्रुवारी रोजी ते घरात नसताना आज्ञात चोरट्यांनी त्यांच्या आणि शेजाऱ्याच्या घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा पाच लाखांचा मुद्देमाल लुटून नेला. याबाबत नेहरूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासले. यामध्ये एक महिला आणि पुरुष संशयास्पद फिरताना दिसत होते. हे आरोपी घाटकोपरमधील एका लॉजमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Mumbai, expensive mobile phones
मुंबई : ऑनलाईन फसवणूक करून महागड्या मोबाईलची खरेदी
pune marathi news, pune bail marathi news
पुणे: बनावट कागदपत्रे तयार करून जामीनदार उभा करणे अंगलट; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा

हेही वाचा – मुंबई : रखडलेले ५१७ ‘झोपु’ प्रकल्प मार्गी लागणार; झोपु प्राधिकरणाकडून ९० विकासकांची यादी तयार

हेही वाचा – आमदारांच्या नावाने दूरध्वनी करून बॉम्बस्फोटाची दिली माहिती ; आमदारांच्या मोबाइल क्रमांक भासवण्यासाठी तंत्रज्ञाना वापर

नेहरूनगर पोलीस ठाण्याच्या पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वेटरचे कपडे परिधान करून परिसरातील सात – आठ लॉजची तपासणी केली. अखेर एका लॉजमधून या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. सौरव यादव (२४) आणि शौयाना यादव (२२) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.