मुंबई : महसुल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) मुंबई एअर कार्गो संकुलात केलेल्या कारवाईत डीजे लाइटमध्ये १२ किलो सोने सापडले. त्याची किंमत सुमारे १० कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. या तस्करीमागे सराईत टोळी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई एअर कार्गो संकुलामधील डीजे लाइटमध्ये सोने लपवले असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्या माहितीच्याआधारे डीआरआयने एअर कार्गोतील संकुलात शोध मोहीम राबवली. त्यात प्रत्येक डीजे लाइटमध्ये तीन किलो वजनाचे सोने सापडले. डीआरआयने असे १२ किलो सोने जप्त केले. त्याची किंमत नऊ कोटी ६० लाख रुपये आहे. सोन्याच्या तस्करीत सामील असलेल्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली. याच पद्धतीने या टोळीने पूर्वी मोठ्या प्रमाणावर सोने तस्करी केल्याचा संशय आहे. मुंबई डीआरआयने गेल्या आठवड्यात ४८ किलो तस्करीचे सोने जप्त केले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader