अंधेरी चारबंगला येथील पिस्तुलासह दोघांना अटक ; दोन पिस्तुले जप्त | Two arrested with pistol from Andheri Charbangla mumbai print news amy 95 | Loksatta

अंधेरी चारबंगला येथील पिस्तुलासह दोघांना अटक ; दोन पिस्तुले जप्त

अंधेरी पश्चिम येथील चारबंगला परिसरातून दोन संशयीत आरोपींना पिस्तुलासह अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अंधेरी चारबंगला येथील पिस्तुलासह दोघांना अटक ; दोन पिस्तुले जप्त
( संग्रहित छायचित्र )

अंधेरी पश्चिम येथील चारबंगला परिसरातून दोन संशयीत आरोपींना पिस्तुलासह अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून दोन गावठी पिस्तुले व सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. वर्सोवा पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींविरोधात भारतीय हत्यार बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अंधेरी चारबंगला परिसरात एक संशयीत पिस्तुलांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जावेद शेख यांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली.

हेही वाचा >>> VIDEO: “…तर त्यांचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही”, ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा दुसरा टीझर लाँच

शनिसिंह मुकेशकुमार ठाकूर (२१) व अब्दुल करीम रेहमान अन्वर कुरेशी (४९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील ठाकूर हा मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असून तेथे पिस्तुलाची विक्री करण्यासाठी आला होता. कुरेशी याने आरोपीकडून एक पिस्तुल खरेदी केली. ठाकूरकडून एक पिस्तुल व चार काडतुसे तसेच कुरेशीकडून एक पिस्तुल व दोन काडतुसे जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींना न्यायालयाने ६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
गोवंडी आत्महत्या प्रकरण : कुटुंबप्रमुख शकीलने पत्नी व मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याचा निष्कर्ष

संबंधित बातम्या

“आमच्यामध्ये काय हिंमत आहे हे संजय राऊतांना किमान…”; शंभूराज देसाईंनी दिलं प्रत्युत्तर!
मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश? सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, “कलम १४४ चे निर्देश…”
मुंबई: प्रवाशांच्या सेवेत आता स्वच्छ, सुस्थितीतील एसटी गाड्या; बस, आगार आणि बस स्थानक स्वछतेसाठी कृती आराखडा
खारमध्ये डिलिव्हरी बॉयकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, पीडिता म्हणाली, “त्याने माझे…”
मुंबई: बीडीडी चाळ प्रकल्पासाठी म्हाडाला ‘झोपु’कडून दोन हजार कोटींचे कर्ज हवे!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
उदय सामंत यांनी दिली जत तालुक्यातील गावांना भेट, स्थानिकांनी मांडल्या व्यथा!
सांगली: वाळवा तालुक्यात ऊसाच्या फडात आढळला जखमी रानगवा; उपचारानंतर नैसर्गिक आधिवासात सोडणार
Team India: राहुल द्रविडची प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी? बीसीसीआयकडून हालचालींना वेग
Himachal Pradesh Election Exit Poll : हिमाचलमध्ये भाजपा-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत; सत्ता परिवर्तनाची परंपरा कायम राहण्याची चिन्ह!
महाराष्ट्र तोडण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न होतोय; उद्धव ठाकरेंचा नाव न घेता भाजपावर हल्ला