महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपट तयार करण्यासाठी राज्य सरकारने मे. इलोक्योन्स मीडिया प्रा. लि. या खासगी चित्रपट निर्मिती संस्थेला २ कोटी २० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

महात्मा फुले यांच्यावर चित्रपट निर्माण करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला होता. परंतु अनेक कारणांनी चित्रपट निर्मितीला सुरुवातच झाली नाही. ‘लोकसत्ता’ ने याला वाचा फोडली होती.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

राज्य सरकारने निधीचा प्रश्न मार्गी लावल्याने चित्रपट निर्मितीला चालना मिळणार आहे. राज्य सरकारने निधी मंजूर करताना चित्रपट निर्मिती प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यास संबंधित संस्थेला सांगितले आहे.

महात्मा फुले यांच्यावरील चित्रपट निर्मिती प्रक्रियेत कुठेही खंड पडणार नाही, याची खबरदारी घेणे तसेच चित्रपट पूर्ण करण्याचा कालबद्ध कार्यक्रम तयार करून शासनास सादर करणे, त्याचबरोबर चित्रपट निर्मिती ऐतिहासिक सत्याला धरून होत असल्याबाबत खात्री करून त्याबाबत निर्मिती प्रक्रियेवर देखरेख ठेवणे व चित्रपट विहित कालावधीत आणि मंजूर निधीच्या मर्यादेत पूर्ण

करून घेण्याची जबाबदारी माहिती व जनसंपर्क संचालनालयावर सोपविण्यात आली आहे.