दोन परदेशी महिलांना २० कोटींच्या हेरॉइनसह अटक

झायनाहकडे एक किलो ९४२ ग्रॅम तर तिची आई फातुमाकडे एका किलो ९६८ ग्रॅम हेरॉईन सापडले.

मुंबई : सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळावर केलेल्या कारवाईत २० कोटी रुपयांच्या हेरॉईनसह दोन परदेशी महिलांना सोमवारी अटक केली. आरोपी युगांडा देशाच्या नागरिक असून त्यांनी सुदानवरून मुंबईत एका तस्कराला देण्यासाठी हेरॉईनचा साठा आणला होता.  क्येनगेरा फातुमा (४५) व त्यांची मुलगी मनसिंबे झायनाह (२७) यांना अटक करण्यात आली आहे. दोघी जुबूवरून दुबई व दुबईवरून मुंबई असा प्रवास करून सोमवारी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्या होत्या. संशयित महिला अमली पदार्थासह मुंबईत येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचला. स्कॅनरद्वारे त्यांच्याकडील सामानाची तपासणी केली असता त्यात संशयास्पद पूड आढळली.  तपासणी केली असता ते हेरॉईन असल्याचे निष्पन्न झाले. दोघींकडे तीन किलो ९१० ग्रॅम हेरॉईन सापडले असून त्याची किंमत सुमारे २० कोटी रुपये आहे. दोघींना अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.  झायनाहकडे एक किलो ९४२ ग्रॅम तर तिची आई फातुमाकडे एका किलो ९६८ ग्रॅम हेरॉईन सापडले. दोघींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two foreign women arrested with rs 20 crore heroin zws

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या