केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सुरू असलेल्या सर्वेक्षणाअंतर्गत दररोज करोना चाचणी करण्यात येत आहे. विमानतळावर सोमवारी करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये दोन प्रवासी करोनाबाधित असल्याचे आढळले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या दोन रुग्णांमुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापडणाऱ्या करोना बाधित रुग्णांची संख्या २३ झाली आहे.

हेही वाचा- “अडीच लाख कोटींची गुंतवणूक डोळ्यासमोरून निघून गेली, तेव्हा…”; डाव्होस दौऱ्यावरून संजय राऊतांचं शिंदे सरकारवर टीकास्त्रहेही वाचा-

dubai flood
Dubai Flood: दुबईची झाली डुबई! दोन वर्षांचा पाऊस एकाच दिवसात, वाळवंटात आला पूर, पाहा VIDEO
pune airport marathi news
पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल कधी सुरु होणार? विमानतळाच्या संचालकांनी दिलं उत्तर…
Mumbai flight canceled due to off runway lights at Nagpur airport
नागपूर: धावपट्टीवर अंधार, मुंबई विमान रद्द
Mumbai, Cyber ​​fraud, Taddeo,
मुंबई : ताडदेवमधील आंतराष्ट्रीय शाळेची ८७ लाखांची सायबर फसवणूक, सायबर पोलिसांना ८२ लाख रुपये गोठवण्यात यश

चीनमध्ये करोनाच्या सापडलेल्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर उतरणाऱ्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर उतरणाऱ्या प्रवाशांचेही २४ डिसेंबरपासून सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असून दोन टक्के प्रवाशांचे नमूने करोना चाचणीसाठी घेण्यात येत आहेत. करोनाबाधित प्रवाशांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. आतापर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन आंतरराष्ट्रीय विमानतळांवर चार लाख १२ हजार ४० इतके प्रवासी उतरले असून, त्यातील नऊ हजार ४१५ रुग्णांची करोना चाचणी करण्यात आली.

हेही वाचा- “इकबालसिंह चहल यांना चौकशीला बोलावलं, याचाच अर्थ…”, अनिल परबांचा शिंदे सरकारला अप्रत्यक्ष टोला

विमानतळावर सोमवारी उतरलेल्या प्रवाशांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी दोघांना करोनाची बाधा झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे आतापर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सापडलेल्या रुग्णांची संख्या २३ झाली आहे. यामध्ये मुंबईतील पाच, पुण्यात तीन, नवी मुंबई, अमरावती, सांगलीतील प्रत्येकी एक रुग्ण सापडला. तर उर्वरित रुग्णांमध्ये चार रुग्ण गुजरात, दोन रुग्ण केरळ, गोवा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, आसाम, ओडिसा व तेलंगणातील प्रत्येकी एक रुग्ण आहे.