वांद्रे खाडीत दोन जण बुडाले ; एकाचा मृतदेह सापडला

वांद्रे पश्चिमेला एस व्ही रोड आणि सी लिंक रोड जंक्शन जवळ ही दुर्घटना घडली.

वांद्रे खाडीत दोन जण बुडाले ; एकाचा मृतदेह सापडला
( संग्रहित छायचित्र )

वांद्रे येथील खाडीत गुरुवारी रात्री दोन जण बुडाले. वांद्रे पश्चिमेला एस व्ही रोड आणि सी लिंक रोड जंक्शन जवळ ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील एका व्यक्तीचा मृतदेह आज सकाळी सापडला.

वांद्र्याजवळच्या खाडीत ११ ऑगस्टच्या रात्री साडेअकरा वाजता दोन तरुण बुडल्याची घटना घडली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते व त्यांनी दोघांचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली होते. ३० ते ४० वयोगटातील हे दोघे जण असल्याची प्राथमिक माहिती येथील नागरिकांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी त्यापैकी एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना आढळला.

जावेद आलम शेख असे या २८ वर्षीय तरुणाचे नाव आहे. बांद्रा रेक्लमेशन येथील उड्डाणपूलाजवळ त्याचा मृतदेह आढळला. अग्निशमन दलाने मृतदेह बाहेर काढून पोलिसांकडे सोपवला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two people drowned in bandra bay mumbai print news amy

Next Story
आरे कारडशेडवरुन फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले “फक्त आपल्या अहंकारासाठी…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी