गेल्या चोवीस तासात कोसळणाऱ्या पावसाने मुंबईत काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. कुलाबा येथील एक मजली झोपडीचा भाग पडून एका बालकासह दोन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुलाबा मधील कफ परेड परिसरात गीता नगर मध्ये एक मजली बांधकाम पडून दोन जण जखमी झाले. अंजुलाल गुप्ता (४० वर्षे) आणि रितेश गुप्ता (१२) अशी या दोघांची नावे असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती स्थिर आहे.

गेल्या चोवीस तासात शहर भागात १, पूर्व उपनगरात १ तर पश्चिम उपनगरात १ ठिकाणी पडझड झाल्याच्या घटनांची तक्रार पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे आली. मुंबईत चार ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या दुर्घटना घडल्या. तर ४३ ठिकाणी झाडे व फांद्या पडल्याच्या तक्रारी आल्या.

दरम्यान, गेल्या चोवीस तासात पश्चिम उपनगरात सर्वाधिक ३३.०६ मिमी पावसाची नोंद झाली. तर शहर भागात २६.८७ मिमी, पूर्व उपनगरात ३१.३८ मिमी पाऊस पडला.पुढील २४ तासांकरिता वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडेल. अधूनमधून ४० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two people injured after one storey building collapsed in colaba mumbai print news amy
First published on: 10-08-2022 at 13:47 IST