मुंबईतल्या वडाळा अँटॉप हिल भागात चाळीची भिंत कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होते आहे. मुंबईतल्या अँटॉप हिल भागातल्या विजय नगर येथील पंजा गल्लीतील ही घटना आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर भिंत कोसळून ही घटना घडली आहे.

दोन महिलांचा मृत्यू

चाळीची भिंत कोसळून शोभादेवी मौर्य (वय-४५) आणि झाकिरुन्निसा शेख (वय-५०) अशी या दोन मृत महिलांची नावं आहेत. या दोन महिलांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
What Bhujbal Said About Raj Thackeray ?
छगन भुजबळांचा राज ठाकरेंना सवाल, “बाळासाहेब आणि तुमचं रक्ताचं नातं, मग तुम्ही..”
wrestler Suraj Nikam Suicide
‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमने गळफास घेत आयुष्य संपवलं, कुस्ती विश्वावर शोककळा
naseem shah
USA VS IRE T20 World Cup: पाकिस्तान ट्वेन्टी२० वर्ल्डकपमधून माघारी; अमेरिकेचं सुपर८चं स्वप्न साकार
Transfer of Assistant Commissioner of Municipal Corporation in Andheri Mumbai
अंधेरीतील महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची बदली; वर्सोवा येथील अनधिकृत बांधकामप्रकरण भोवल्याची चर्चा
What Kiran mane Said About Ketki Chitale?
केतकी चितळेला किरण मानेंचा सवाल, “अभिमानाने ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ जात सांगणारी ताई आता हिंदू..”
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”

वडाळा अँटॉप हिल विजय नगर भागातली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, आज रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. चाळीचा काही भाग कोसळला. वडाळा अँटॉप हिलच्या विजय नगरमधील पंजा गल्ली परिसरात ही घटना घडली. चाळीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील आणि वरच्या तीन मजल्यांवरील भिंतीचा काही भाग कोसळला होता आणि काही भाग लटकलेल्या स्थितीत होता अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दुर्घटनेत दोन महिला जखमी झाल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, या जखमींना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं.