मुंबई : जगातील मराठी भाषिकांना एकत्र करण्यासाठी खासगी संस्था गेली वीस-पंचवीस वर्षे साहित्य-सांस्कृतिक संमेलने घेत असताना आता शासनानेही विविध देशांत विखुरलेल्या मराठीजनांना एकत्र आणण्यासाठी विश्व संमेलनाचे आयोजन केले आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन वेगवेगळय़ा ठिकाणी वैश्विक मराठी संमेलने होणार आहेत. त्यामुळे मराठीच्या प्रसारासाठी जगभरातून इथे एकत्र येणारी मराठी माणसे आपल्याच भूमीत येऊन विभागली जाणार आहेत.

मुंबईत बुधवारपासून सलग तीन दिवस ‘विश्व मराठी संमलेना’चे आयोजन करण्यात आले आहे. वरळी येथे रंगणाऱ्या या संमेलनात जगभरातील पाचशेहून अधिक तर विविध राज्यांतून बाराशेहून अधिक मराठी भाषिक उपस्थित राहणार असल्याचा मराठी भाषा विभागाचा अंदाज आहे. या संमेलनाचे आयोजन राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने करण्यात आले असल्याचे विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
पुण्यातही पिंपरी येथे ६ ते ८ जानेवारीदरम्यान १८ व्या जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनातही अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण कोरिया, नेदरलँड, मॉरिशस, न्यूझीलंड अशा विविध देशांमधील मान्यवर मराठीजनांचा सहभाग असणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप यांच्याबरोबर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सहभाग असणार आहे.

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Competition with sakhar gathi coming from Gujarat in sakhar gathi business for gudhi padwa 2024
पाडव्यासाठीच्या साखर गाठी व्यवसायात गुजरातशी ‘गाठ’
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?

ही संमेलन भरवण्याची स्पर्धा नाही..
गेली २० वर्षे आम्ही ‘शोध मराठी मनाचा’ नावाने जागतिक मराठी संमेलन भरवत आहोत. दरवर्षी ५ ते ९ जानेवारीदरम्यान आम्ही राज्यातील विविध जिल्ह्यांत वा शहरांत हे संमेलन भरवतो. शासनाच्या वतीने अशाप्रकारे विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात येणार आहे हे आम्हाला आधी सूचित करण्यात आले असते तर आम्ही आमचे संमेलन रद्द केले असते, अशी भूमिका जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष आणि संमेलनाचे आयोजक रामदास फुटाणे यांनी मांडली.

शासकीय कार्यक्रमातील सहभागासाठी लाखोंचे मानधन
मराठी भाषा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘विश्व मराठी संमेलनात’ अमेरिकेहून येणाऱ्या मराठीजनांना लाखभर मानधन, अमेरिकेतर देशातून येणाऱ्यांना ७५,००० रुपये मानधन तर महाराष्ट्राबाहेरील राज्यांतून येणाऱ्यांना ५०,००० रुपये मानधन देण्यात येणार आहे. कार्यक्रम ऐकायला येणाऱ्यांसाठी कोटय़वधींची उधळपट्टी करणारे हे पहिलेच संमेलन असावे, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.