इराणच्या जहाजावर राज्यातील दोन तरुण अडकले

विक्रोळीतील आशीष सकपाळ या तरुणाने नवी मुंबईतील संस्थेतून नाविक म्हणून काम करण्याचे प्रशिक्षण घेतले होते.

|| अमर सदाशिव शैला

मदतीची प्रतीक्षा; लाखो रुपये उकळून दलाल नामानिराळा

मुंबई : इराणमधील जहाजावर खलाशाचे काम करण्यासाठी गेलेले दोन नाविक २१ महिन्यांहून अधिक काळ तेथे अडकून पडले आहेत. ११ महिन्यांचा पगारही त्यांना मिळाला नसून आता फक्त परतीचा मार्ग सापडावा या आशेवर आशीष सकपाळ आणि अरहाम शेख हे दिवस ढकलत आहेत.

विक्रोळीतील आशीष सकपाळ या तरुणाने नवी मुंबईतील संस्थेतून नाविक म्हणून काम करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर अनुभवासाठी आणि नोकरीच्या अपेक्षेने त्याची ओळख एका कंपनीच्या दलालाशी झाली. इराण येथील जहाजावर नोकरी देण्याचे आश्वासन दलालाने त्याला दिले. त्या बदल्यात आशीषकडून  ३ लाख २५ हजार रुपये घेतले. त्यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये त्याने आशीषचा इराणमधील एका कंपनीशी करार करून दिला.

त्यानुसार त्याला २२ हजार रुपये मासिक पगारावर ११ महिन्यांसाठी इराणमधील जहाजावर नोकरी देण्याचे आश्वासन दिले. इराणमध्ये गेल्यावर तेथील परिस्थिती भिन्न असल्याचा अंदाज त्याला आला. तेथे मोठ्या जहाजाऐवजी त्याला छोट्या ‘टग’ बोटीवर कामाला ठेवण्यात आले. इराणमधील मालकाने काही महिने पगार न दिल्याने आशीषने त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा मुंबईतील दलालाने विनापगार नोकरीचा करार केल्याचे त्याला समजले. त्यामुळे आशीषने नोकरी सोडण्याबाबत बोलणी करताच मासिक ११ हजार रुपयांचा पगार देण्याचे बोटीच्या मालकाने मान्य केले.

तसेच करार पूर्ण होताच सर्व पगार एकत्रित दिला जाईल, असे त्याला सांगण्यात आले. करारानुसार ११ महिने पूर्ण होताच त्याने मालकाकडे नोकरीतून मोकळे करण्याची विTwo young men from the state were stranded on an Iranian ship akp 94 | नंती केली. मात्र मालकाने टाळाटाळ सुरू केली, पगार देण्यास नकार दिला. त्यातच आशीषचे पारपत्र हरविले असल्याचे त्याला सांगण्यात आले. अखेर त्याच्या कुुटुंबीयांनी ऑल इंडिया सीफेरर युनियनशी संपर्क साधून त्यांना मदतीची विनंती केली. युनियने परराष्ट्र मंत्रालय आणि इराणमधील भारतीय दूतावास यांच्याशी संपर्क साधून पारपत्र मिळवून दिले.पारपत्र मिळाले असले तरी व्हिसा संपला. मालक व्हिसा देईपर्यंत आणखी किती दिवस बंद जहाजावर दिवस काढावे लागतील याची कल्पना नाही, असे आशीषने सांगितले.

‘मुलगा माघारी यावा हीच अपेक्षा आहे. दलालाने आमची फसवणूक केली. आता त्याचा फोनही बंद आहे. युनियनच्या मदतीने आम्ही मुलाच्या परतीसाठी प्रयत्न करत आहोत,’ असे आशीषचे वडील भगवान सकपाळ यांनी सांगितले.

फसवणुकीच्या प्रकारात वाढ : सध्या इराणमध्ये ५० हून अधिक भारतीय मुले अडकून पडली आहेत. यातील १७ मुले युनियनच्या संपर्कात आहेत. जे दलाल भारतातून तरुणांना परदेशात कामाला पाठवितात, ते कराराचे पालन करतात की नाही याची पाहणी डी. जी. शिपिंगने करणे आवश्यक आहे. दलाल तरुणांकडून पैसे उकळून शोषण करतात. याला वेळीच आला घातला पाहिजे, अशी मागणी ऑल इंडिया सीफेरर युनियनचे कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे यांनी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two young men from the state were stranded on an iranian ship akp

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या