मुंबई : ‘मी विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातील मतदार असून माझे पदवी प्रमाणपत्र खरे असल्याचा टोमणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता मारला. शिवसेना आणि मुंबईकरांचे वेगळे नाते असून ज्येष्ठ नेते प्रमोद नवलकर यांनी या मतदारसंघातून प्रतिनिधीत्व केले होते. पदवीधर मतदार कायमच शिवसेनेची साथ देतील, असे नमूद करीत ठाकरे यांनी कोकण पदवीधर व नाशिक शिक्षक मतदारसंघातील प्रश्न सुटला असल्याचे स्पष्ट केले.

मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ॲड. अनिल परब यांच्या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. त्यावेळी विविध मुद्द्यांवर बोलताना ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये कोणताही बिघाड झालेला नाही. विधानपरिषदेच्या काही जागांबाबत सुरुवातीला काँग्रेसबरोबर समन्वय नव्हता. वेळ वाया जाऊ नये, यासाठी आधी काही नेत्यांनी अर्ज भरून ठेवले होते. पण काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी नवी दिल्लीत बोलणी झाल्यावर कोकण आणि नाशिकबाबत समझोता झाला आहे.

uddhav thackeray
शिवसेना ठाकरे गटाचा तीन ऑगस्टला पुण्यात मेळावा; उद्धव ठाकरे यांची उपस्थिती
Sujay Vikhe, Nilesh Lanke selection,
नीलेश लंकेंच्या निवडीला सुजय विखेंकडून आव्हान
Amol Kirtikar challenge to Ravindra Waikar MP
वायकर यांच्या खासदारकीला अमोल कीर्तिकरांचे आव्हान
Nagpur, smart prepaid meters, Devendra Fadnavis, Anti Smart Electric Meter Citizen Struggle Committee, Mahavitaran, protest, electricity sector
सरकारवर लोकांचा विश्वास नाही? स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात पुन्हा आंदोलन…
Dr Madhav Kinhalkar, Dr Madhav Kinhalkar Resigns from BJP, Dr Madhav Kinhalkar next political decision, Bhokar Assembly constituency, nanded, sattakaran article, Maharashtra vidhan sabha election 2024,
सूर्यकांता पाटील यांच्यापाठोपाठ माधव किन्हाळकर यांचाही भाजपाला रामराम
Bhagirath Bhalke meet Sharad Pawar
भगीरथ भालके शरद पवारांच्या भेटीला, घरवापसीच्या चर्चांना उधाण, पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार?
Ajit Pawar vilas lande
अजित पवारांच्या चिंता वाढली? आमदार विलास लांडे शरद पवारांच्या संपर्कात? जवळचा मित्र म्हणाला, “त्या भेटीनंतर…”
leaders photo missing from rohit patil birthday hoarding
आमदारपुत्र रोहित पाटलांच्या वाढदिनी शुभेच्छा जाहिरात फलकावरुन वरिष्ठ नेत्यांची फोटो गायब

हेही वाचा >>> पराभवाचे खापर आमच्यावर नको; ‘ऑर्गनायझर’मधील लेखावर राष्ट्रवादीची भूमिका

मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर जम्मू व काश्मीरमध्ये तीन दिवसांमध्ये तीन दहशतवादी हल्ले झाले. राज्यघटनेतील ३७० कलम काढल्यानंतर तेथील परिस्थितीत कोणता फरक पडला? केंद्र सरकार केवळ विरोधकांना संपविण्यात वेळ वाया घालवीत आहे. मणिपूरच्या हिंसाचाराची माहिती संघाकडे वर्षभरानंतर पोचली आहे. आता सरसंघचालकांनी हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केल्यावरही आपलेच ढोल वाजवत राहणार की मोदी तेथे जाणार, असा सवाल त्यांनी केला.

२८८ जागांची चाचपणी

ठाकरे यांनी राज्यातील संपर्क प्रमुखांची बैठक घेतली असून सर्व २८८ मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, प्रश्न व अन्य मुद्द्यांवर अहवाल मागविला आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप योग्य वेळी होईल. पण सर्व कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या आहेत. मात्र त्यामुळे शिवसेना आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची चाचपणी करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.