मुंबई : भिवंडी शहर व परिसरात लॉजिस्टिकच्या मोठ्या संधी असून, तेथे या उद्योगाचा विकास करणे आवश्यक आहे. त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील. आशिया खंडातील सर्वात चांगला लॉजिस्टिक हब निर्माण करण्याची क्षमता भिवंडी शहर परिसरात आहे. तो विकसित करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
आमदार रईस शेख यांनी याबाबत अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. त्यावर भिवंडी परिसरातील पायाभूत सोयी सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास करून लॉजिस्टिक हबची उभारणी केली जाईल, असे सामंत यांनी सांगितले.