लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : आपल्या देशामध्ये सर्वसामान्यांची ताकद काय असते, ते दाखवून दिले आहे. सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले तरी एका बोटाने आपण त्यांना हरवू शकतो, त्यांना रोखू शकतो, हे देशातील जनेतेने जगाला दाखवले आहे, अशी बोचरी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. 

India boycott of PM speech Modi Dhankhad criticize opponents
सभात्यागामुळे सत्ताधाऱ्यांना बळ; पंतप्रधानांच्या भाषणावर ‘इंडिया’चा बहिष्कार; मोदी, धनखड यांची विरोधकांवर टीका
supriya shrinate replied to jagdeep dhankhar
“मर्यादा विरोधकांनी नाही, तर मोदींनी सोडली”, जगदीप धनखड यांच्या ‘त्या’ विधानाला सुप्रिया श्रीनेत यांचे प्रत्युत्तर!
Parliament Session 2024 LIVE Updates in Marathi
“माझ्या भाषणातील काही भाग वगळणं हे लोकशाही तत्त्वाच्या विरोधात”, राहुल गांधींचे लोकसभा अध्यक्षांना पत्र; म्हणाले..
Sharad Pawar, Sharad Pawar latest news,
कोणत्याही खासदाराला पुन्हा निवडणुका नको वाटतात – शरद पवार
Uddhav Thackeray opinion that besides the Ladki Bahin scheme announce the scheme for the brothers too
‘लाडकी बहीण’बरोबरच भावांसाठीही योजना जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा
Opponents displeasure over emergency protest proposal
आणीबाणीच्या निषेधाच्या प्रस्तावावर विरोधकांची नाराजी
mayawati with akash anad
परिपक्व नाही म्हणणार्‍या पुतण्यालाच मायावतींनी केले उत्तराधिकारी; यामागची नेमकी रणनीती काय?
Six months ago I told Ajit Pawar that I will not take up the post of guardian minister of Gondia says Dharmaraobaba Atram
पालकमंत्री पद झेपणार नाही, हे अजित पवारांना आधीच…

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की ‘इंडिया’ आघाडीने सत्ता स्थापनेसाठी दावा केलाच पाहिजे. याबाबत बुधवारी दिल्लीत बैठक आहे. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल, याबाबत या बैठकीत चर्चा होईल. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय, इंडिया आघाडी स्थापन केली तेव्हापासून सांगतोय की, आमच्यापैकी कुणीही पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाही. देशातील लोकशाही, संविधान वाचवले पाहिजे, हुकूमशाहीपासून वाचविले पाहिजे, ही आमची एकत्र येण्यामागची भावना होती. हीच भावना अजूनही कायम आहे.

हेही वाचा >>>राज्यात महाविकास आघाडीची मुसंडी; भाजपला मोठा फटका, काँग्रेसला सर्वाधिक जागा

इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला जाईल. आम्ही सोबत राहू, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘एनडीएक’डे बहुमत आहे, असे दाखवले जातेय. मात्र बिहारमध्ये मतमोजणी उशिराने सुरू झाली. या जुलूम जबरदस्तीला सगळे कंटाळले आहेत. या विरोधात सर्व पक्ष एकत्र येतील आणि पुन्हा या जुलूमजबरदस्तीचे सरकार येऊ देणार नाही, याची खात्री आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.