uddhav thackeray criticized shinde camp on bow and arrow sign spb 94 | Loksatta

“काँग्रेसने नाही केलं, ते तुम्ही…”, इंदिरा गांधींचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका

आज उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली.

“काँग्रेसने नाही केलं, ते तुम्ही…”, इंदिरा गांधींचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका
शिवसेनेचे दोन खासदार आणि पाच आमदार आज शिंदे गटात प्रवेश कऱणार, खासदाराचा दावा

गेल्या काही दिवसापांसून ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू होता. या वादानंतर शनिवारी ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली.

हेही वाचा – निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले, “धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याला…”

“हेच तुमचं हिंदुत्त्व आहे का?”

“दसऱ्या मेळाव्यात मी उल्लेख केल्याप्रमाणे आता शिवसैनिकांना दमदाटी करणे सुरू आहे. शिंदे गटात प्रवेश करा नाही तर तुमच्यावर केसेस पडतील अशा धमक्यांना देण्यात येत आहेत. ज्या शिवसैनिकांच्या जोरावर तुम्ही मोठे झालात, त्यांना धमक्या देताना काहीच वाटत नाही का? हेच तुमचं हिंदुत्त्व आहे का?” अशी टीका त्यांनी शिंदे गटावर केली.

हेही वाचा – तीन चिन्ह, तीन नावं.. उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव; म्हणाले, “लवकरात लवकर…!”

इंदिरा गांधीचाही केला उल्लेख

“आणीबाणीच्या काळा इंदिरा गांधींनी नाही केलं, ते तुम्ही करत आहात. त्यावेळी शिवसेनेवर बंदी घाला असा प्रस्ताव इंदिरा गांधीकडे आला होता. मात्र, त्यांनी शिवसेनेवर बंदी न घालण्याचा निर्णय घेतला. त्यावेळीही शिवसैनिकांना त्रास होत होता, तडीपारीही सुरू होती, अनेकांना स्थानबद्ध करण्यात येत होते. पण काँग्रेसने कधीही शिवसेना संपवायचा प्रयत्न नाही केला. आज तुम्ही जे आरोप करता की काँग्रेसबरोबर जाऊन आम्ही हिदुत्व सोडलं, तर आज ज्यांचे शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहे, त्यांच्या मांडीला मांडी लाऊन तुम्ही सत्तेस बसला आहात. तर पापी कोण काँग्रेस की भाजपा?” असा प्रश्नही त्यांनी शिंदे गटाला विचारला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-10-2022 at 19:11 IST
Next Story
मुंबई : प्रभादेवी, परळ रेल्वे स्थानकावर दुमजली उड्डाणपूल होणार; आराखड्याला मध्य रेल्वेकडून मंजुरी, मात्र पश्चिम रेल्वेकडून प्रतीक्षा