Uddhav Thackeray Dasara Melava 2022 Live at Shivaji Park, Shinde vs Thackeray : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात दसरा मेळाव्यावरून तुफान राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. अखेर मुंबईच्या शिवाजी पार्कवर सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. तर दुसरीकडे बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. या पार्श्वभूमीवर या सभेतील नेतेमंडळींच्या भाषणांकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं होतं. अपेक्षेप्रमाणे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तुफान आरोप-प्रत्यारोप आणि टोलेबाजी या भाषणांमध्ये पाहायला मिळाली.