मुंबई: मुंबई, ठाण्यातील संथ मतदानप्रकरणी निवडणूक आयोगावर केलेली टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भोवण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाकरे यांच्या आरोपांची शाहनिशा करण्याचा निर्णय मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

संथ मतदानाबाबत मुंबई, ठाणे येथील जिल्हाधिकाऱ्यांकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागविण्यात आला असून, त्याआधारे ठाकरे यांनी केलेल्या आरोपांची पडताळणी केली जाईल. त्यात काही तथ्य आढळले नाही तर ठाकरेंवर नियमानुसार कारवाई केली जाईल असे निवडणूक आयोगातील सुत्रांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या पाचव्या टप्यात २० मे रोजी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यांत मतदान पार पडले होते. त्यावेळी मुंबई, ठाण्यात संथ मतदानामुळे मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल
IND beat BAN by 50 Runs
IND v BAN: भारताचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय, या विजयासह टीम इंडियाने केली वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
IAS Pooja Khedkar father Dilip Khedkar
Pooja Khedkar Father First Reaction : IAS पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या मुलीने चूक…”
Rahul Gandhi
“करुन दाखवलं”, तेलंगणातील शेतकऱ्यांचं ३१ हजार कोटींचं कर्ज माफ केल्यानंतर राहुल गांधींची खास पोस्ट

यावेळी तीव्र उन्हाळा असूनही मतदारांसाठी आयोगाने कोणतीही व्यवस्था केली नसल्याचा आरोप करीत अनेक ठिकाणी मतदारांनी आपला संताप व्यक्त केला होता. त्याच दिवशी दुपारी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन  निवडणूक आयोगावर जोरदार आरोप केले होते.

ठाकरे यांच्या या आरोपावर नाराजी व्यक्त करीत मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. शेलार यांच्या पत्रानंतर आयोगाने ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचा तपशील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयांकडून मागविला होता.

हेही वाचा >>>मुंबई: बेलासिस उड्डाणपूल सोमवारपासून बंद

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या तपशिलानंतर आयोगाने ३ जून रोजी ठाकरे यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

कारवाईचे संकेत

जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल आल्यावर ठाकरे यांच्या आरोपात खरोखरच तथ्य होते की त्यांनी केवळ आयोगाला बदनाम करण्यासाठी हे आरोप केले याची शहानिशा केली जाणार आहे. ठाकरे यांनी केवळ राजकीय भूमिकेतून आयोगावर हेत्वारोप केल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांच्याविरोधात नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती आयोगातील अधिकाऱ्याने दिली.