मुंबई :बेळगावसाठी नवस करायला मुख्यमंत्री का जात नाहीत? | Uddhav Thackeray questioned Chief Minister Eknath Shinde regarding Belgaum amy 95 | Loksatta

मुंबई: बेळगावसाठी नवस करायला मुख्यमंत्री का जात नाहीत?

उद्धव ठाकरे यांचा टोला

मुंबई: बेळगावसाठी नवस करायला मुख्यमंत्री का जात नाहीत?
(संत सेवालाल महाराज यांचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी शनिवारी मुंबईत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला.)

बेळगाव महाराष्ट्रात यावे, हा नवस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री व आमदारांना घेऊन गुवाहाटीला का जात नाहीत, असा खोचक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला. सीमाप्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आक्रमक असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र मौन बाळगले असल्याने ठाकरे यांनी टीका केली आहे.

ठाकरे यांनी कर्नाटक सीमाप्रश्नावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. कर्नाटकने आपल्या तलावात पाणी सोडले आणि आपले राज्य सरकार सत्तेच्या पाण्यात गटांगळय़ा खात आहे. या नेभळटपणाविरोधात सर्वानी एकजुटीने उभे राहिले पाहिजे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये अयोध्येत महाराष्ट्र भवन करणार असल्याची घोषणा मी केली होती. त्या घोषणेला शिंदे सरकारने स्थगिती दिली असेल, तर माहीत नाही, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 05:49 IST
Next Story
५०० कोटी रुपयांच्या ‘आयफोन’ची तस्करी; कंपनी मालकाला अटक, २०० कोटींचे सीमाशुल्क बुडवल्याचा आरोप