मुंबई: एसआयआरविरोधात मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतल्यानंतर आता याविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरे याविरोधात एकत्र येणार असून सर्व विरोधकांनी याविरोधात एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. या दोन्ही पक्षाच्या वतीने येत्या ४ ऑक्टोबरला एसआयआर विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी एक्स या समाज माध्यमातून जनमोर्चाची घोषणा केली. ही घोषणा करताना त्यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत, अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची घोर फसवणूक केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

या विरोधात मनसे आणि शिवसेना (ठाकरे) येत्या ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत एक जनमोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या आयोजनात जरी मनसे आणि शिवसेनेचा पुढाकार असला तरी हा जनतेचा मोर्चा आहे. हा मोर्चा एका पक्षापुरता न राहता तो तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी संवाद साधणार आहोत, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या ४ ऑक्टोबर २०२६ ला मुंबईत एक जनमोर्चा काढणार आहे.

या मोर्चाच्या आयोजनात जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा पुढाकार असला तरी हा जनतेचा मोर्चा आहे आणि हा एका पक्षापुरता न राहता तो तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना या मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी संवाद साधणार आहोत, असे आवाहन राज ठाकरे यांनी समाजमाध्यमावरील आपल्या संदेशातून केले आहे.