scorecardresearch

ठाकरे-आंबेडकरांची युती, मात्र वंचित महाविकास आघाडीचा भाग असेल का? उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही यासंदर्भात…”

शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची घोषणा आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ठाकरे-आंबेडकरांची युती, मात्र वंचित महाविकास आघाडीचा भाग असेल का? उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही यासंदर्भात…”
संग्रहित छायाचित्र

शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची घोषणा आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये युती झाली असली, तरी वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा भाग असेल का? याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. दरम्यान, याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाच – Maharashtra News Live : उद्धव ठाकरेंकडून ‘वंचित-ठाकरे गट’ युतीची घोषणा; म्हणाले, “महाराष्ट्रातील जनता…”

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आज दादरमधील आंबेडकर भवन येथे पत्रकार परिषेद घेत युतीची घोषणा केली. यावेळी पत्रकारांनी त्यांना वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असेल का? असा प्रश्न विचारला. याबाबत बोलताना युद्धव ठाकरे म्हणाले, प्रकाश आंबेडकरांनी त्यांचे राष्ट्रावादी काँग्रेसशी असलेले संबंध सांगितले. आमचेही तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीशी कसे संबंध होते, हे जगजाहीर आहे. परंतू ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की फसवणुकीचं राजकारण सुरू आहे. त्यावेळी आम्ही महाविकास आघाडीचा तयार करण्याचा निर्णय घेतला”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा – “नातेवाईकांचं राजकारण वाढल्याने भांडवलशाही आणि लुटारूंची सत्ता…”, शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं विधान

वंचित मविआचा भाग? उद्धव ठाकरे म्हणाले…

“आम्ही महाविकास आघाडीचा निर्णय घेतला, तेव्हा शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येतील का? अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर आमच्यावर विचित्र आरोप झाले. त्या सर्वांना आम्ही पुरून उरलो. साधारण अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार आम्ही यशस्वीपणे चालवलं. मुळात हेतू चांगला असेल तर पुढच्या सर्व गोष्टी चांगल्या होतात. आम्हाला काल रात्री स्वप्न पडलं आणि आम्ही आज एकत्र आलो असं नाही. यापूर्वी आमच्या बैठका झाल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरही आमची चर्चा झाली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी बरोबर येण्यास कोणाचीही हरकत नाही”, असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 14:30 IST

संबंधित बातम्या