पाकिस्तानमध्ये बॉम्ब फुटायची वाट बघतोय- उद्धव ठाकरे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बॉम्ब फोडण्याच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

CM-fadanvis

“दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. जो फोटो त्यांनी ट्विट केला आहे तो चार वर्षांपूर्वीचा आहे. रिव्हर मार्चच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केल्यानंतर आम्ही त्या मोहिमेशी जोडले गेलो होतो. मी त्यांना मदत करत होतो. जयदीप राणा हा भाड्यानं आणलेला माणूस आहे, असं रिव्हर मार्चने स्पष्ट केलंय. त्यामुळे त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही. मलिकांनी दिवाळीपूर्वी लवंगी फटाका फोडलाय, मी दिवाळीनंतर बाँब फोडणार,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देत “मी पाकिस्तानमध्ये बाँब फुटायची वाट बघतोय”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मुख्यमंत्री वर्षा या निवासस्थानी पत्रकारांबरोबरच्या परिसंवादामध्ये बोलत होते.

तसेच गेल्या काही दिवसांत लसीकरण कमी झालंय. नागरिक लसीकरणासाठी कमी प्रमाणात येत आहेत, त्यांना पकडून पकडून आणू शकत नाही. तर, करोनाची तिसरी लाट येणार की नाही, हे कोणीच सांगू शकत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, “मंत्रालय हे कार्यालय आहे नक्कीच जायला पाहिजे, पण गेलो नाही म्हणून कामं झालं नाहीत असं झालं आहे का? मंत्रालयात जातो येतो, पाट्या टाकतो याला काही अर्थ नाही. वर्षा बंगल्यात कार्यालय आहे, इथून काम सुरू आहे. इतकी वर्षे जे मंत्रालयात जात होते त्यांनी जे काय केलं ते मला निस्तरायचं आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.  

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस..

“नवाब मलिक यांनी जो फोटो त्यांनी ट्विट केला आहे तो चार वर्षांपूर्वीचा आहे. रिव्हर मार्चच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केल्यानंतर आम्ही त्या मोहिमेशी जोडले गेलो होतो. मी त्यांना मदत करत होतो. त्या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी हे फोटो काढण्यात आले आहेत. नवाब मलिकांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला याच्या पाठीमागची मानसिकता दिसत आहे. रिव्हर मार्चने स्पष्ट केले आहे की तो भाड्यानं आणलेला माणूस आहे. त्यामुळे त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही,” असं फडणवीसांनी म्हटलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Uddhav thackeray replied to devendra fadanvis over his comment on nawab malik hrc

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या