मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क देण्यास महापालिकेने अद्याप मान्यता दिली नसली तरी शिवसेनेने मेळाव्याचे भित्तिचित्र (पोस्टर) प्रदर्शित केले आहे.  ‘आतुरता उध्दवसाहेबांच्या गर्जनेची’असे ते समाजमाध्यमांवर झळकले आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळण्यासाठी शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानेही दावा केला आहे. त्यामुळे महापालिकेने विधि खात्याचा सल्ला मागितला असून अद्याप यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. मात्र शिवसेनेने दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली असून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शनिवारी पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली. शाखाप्रमुख व अन्य पदाधिकाऱ्यांचा मेळावाही पुढील आठवडय़ात होणार असून राज्यभरातून हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल होतील, या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.  काहीही झाले, तरी मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असे ठाकरे यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे या मेळाव्यासाठी पोस्टर जाहीर करण्यात आले असून त्यावर दिवंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे छायाचित्र आहे. त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे आहेत. या मेळाव्यातून ठाकरे हे भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे गटाला लक्ष्य करणार असून शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे.

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Sharad pawar reply on Praful patel statement
‘शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास ५० टक्के तयार होते’, प्रफुल पटेलांच्या दाव्यावर शरद पवारांचे प्रत्युत्तर
Blood donation by AAP
केजरीवालांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात आपतर्फे रक्तदान
kumar pillai establish new gang after controversy with chhota rajan
अधोविश्व : कुमार पिल्लई, छोटा राजनशी वाद आणि नवी टोळी

‘शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याचा ठाकरेंचाच हक्क’

पुणे : शिवसेनेच्या परंपरेनुसार मुंबई येथील शिवाजी पार्कवर मेळावा होत असतो. बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेतला आहे. त्यामुळे तेथे मेळावा घेण्याचा हक्क ठाकरे यांनाच आहे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली.

दिल्ली येथील पक्षाच्या अधिवेशनात अजित पवार नाराज नव्हते, ही माध्यमांनी उठविलेली चर्चा आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणीही नाराज नाही, असे सांगत अजित पवार यांच्या नाराजीनाटय़ावर त्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

राहुल गांधी यांच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोक संघटन करणे त्यांना जमले तर ते यशस्वी ठरतील, असे ते म्हणाले. ही यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना पािठबा देऊन त्यात सहभागी व्हायचे की नाही, याबाबतचा निर्णय झालेला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी काँग्रेसच्या भारत जोडो आंदोलनसंदर्भात पाटील यांनी दिली.