विधान परिषद की विधानसभेचा पर्याय स्वीकारणार ?

मुंबई : विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना म्हणजेच आमदार नसताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे सातवे मुख्यमंत्री ठरले आहेत. तर वडील मुख्यमंत्री व मुलगा आमदार हे चित्रही महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रथमच दिसणार आहे. आता ते विधान परिषदेवर जाणार की विधानसभा निवडणूक लढवणार याबाबत उत्सुकता आहे.

Loksabha Election 2024 BJD 33 percent women candidates
भाजपामध्ये असताना पटनाईक सरकारवर करायच्या जोरदार टीका; आता त्याच पक्षाकडून दोन महिला लढवणार निवडणूक
narendra modi
“जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार, राज्याला लवकरच…”, पंतप्रधान मोदींच्या तीन मोठ्या घोषणा
Election Commission show cause notice to Chief Minister regarding political meetings
निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस; ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांची राजकीय बैठक
arunachal cm among 10 BJP candidates elected unopposed in assembly election
अरुणाचलमध्ये भाजपचे दहा उमेदवार बिनविरोध; मुख्यमंत्री पेमा खांडू दुसऱ्यांदा बिनविरोध

बॅरिस्टर ए. आर. अंतुले, वसंतदादा पाटील (१९८३), शिवाजीराव पाटील निलंगेकर, शरद पवार (१९९३), सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण या कॉंग्रेसच्या सहा नेत्यांवर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली तेव्हा हे नेते विधान परिषद किंवा विधानसभा या उभय सभागृहांचे सदस्य नव्हते. नंतर ही नेतेमंडळी  विधानसभा किंवा विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून आले.

उद्धव ठाकरे हे आता विधान परिषदेवर निवडून जाणार की विधानसभेवर याबाबत उत्सुकता आहे. विधान सभेवर निवडून जायचे झाल्यास शिवसेनेच्या एखादा आमदाराला त्यांच्यासाठी राजीनामा द्यावा लागेल आणि पोटनिवडणुकीत उद्धव यांना विधानसभेवर निवडून जाता येईल. पुढील सहा महिन्यांत विधानसभेच्या १२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या वेळी ठाकरे यांना वरिष्ठ सभागृहात प्रवेश करता येईल.