किरीट सोमय्यांना दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने नोटीस पाठवली होती. या प्रकरणावर त्यांनी आज पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मंत्रालयाला दिले आहेत. पण मुख्यमंत्रीसाहेब मी वाट पाहतोय की मंत्रालयात माहिती अधिकाराच्या अवलोकनासाठी गेलेल्या किरीट सोमय्यावर तुम्ही गुन्हा कधी दाखल करताय ते. तुम्ही दिलेले आदेश मंत्रालय पाळत नाही. माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरेंना आव्हान आहे की तुमच्यात हिम्मत असेल तर एफआयआर दाखल करा,” असं किरीट सोमय्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.

“फक्त एका फोटोसाठी मुख्यमंत्री माझ्यावर गुन्हा दाखल करायला सांगत आहेत. दोष काय तर मी खुर्चीवर बसलोय. दोन कर्मचारी माझ्या सेवेत आहे. उद्धव ठाकरे जे खोटं बोलले ती चोरी मी पकडली, त्याचा राग त्या कर्मचाऱ्यांवर ते काढत आहेत. एका गरीब टायपिस्ट लिपीकाला तुम्ही नोटीस देताय. बाळासाहेब ठाकरे कुठे आणि हे मुख्यमंत्री बघा. राजकीय भ्रष्टाचार तुम्ही करताय, लढाई करायची आहे तर माझ्याशी करा, माझ्यावर कारवाई करा, त्या गरीब लिपीकाला नोटीस पाठवताना मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला. मुख्यमंत्र्यांना त्या लिपीकाच्या कुटुंबाची माफी मागावी लागणार,” असं ते म्हणाले.

Eknath Shinde in Raju Parwe Rally
राजू पारवेंच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चालवली बाईक, कडक उन्हात टपरीवर प्यायला चहा
arvind kejriwal latest news marathi
“माय नेम इज अरविंद केजरीवाल अँड आय एम नॉट टेररिस्ट”, तुरुंगातून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा संदेश; संजय सिंह यांनी दिली माहिती
bhavana gawali lok sabha marathi news
भावना गवळींची नाराजी मिटली? उद्योगमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांनीही….
The decision to take Eknath Shinde and Ajit Pawar along with them is the BJP leaders in the state
एकनाथ शिंदे,अजित पवार यांना बरोबर घेण्याचा निर्णय राज्यातील भाजप नेत्यांचाच! केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा दावा

पुढे ते म्हणाले, “ज्या फोटोसाठी मला २ दिवसात कारणे द्या नोटीस पाठवली, तो फोटो माझा आहे. त्यामध्ये  एका अधिकारी आणि एक लिपीक दिसतोय. फोटो अंतरावरून काढलाय. तो काही सेल्फी नाहीये. ज्यांनी फोटो काढला तो अपलोड केला, त्याला नोटीस देण्याऐवजी जे व्हिक्टीम आहेत,” त्यांना ठाकरे सरकार नोटीस देतंय असा आरोप त्यांनी केला.  

“उद्धव ठाकरेंना तो फोटो कोणी काढला आहे, ते माहीत आहे. त्या टायपिस्टसोबत बदला घेण्याचं पाप मुख्यमंत्र्यांनी केलंय. हा फोटो कोणी काढलाय ते तपासून पाहा. तुमच्याकडे मंत्रालय सुरक्षा विभाग आहे,” असं सोमय्या म्हणाले. “तसेच मला कोणत्या कायद्याच्या आधारे नोटीस पाठवली आहे. कायद्याचं सेक्शन दाखवा. की हा उद्धव ठाकरेंचा कायदा आहे, त्यांची ठोकशाही, माफिया सेनेची दादागिरी आणि गुंडागिरी आहे,” असा सवाल त्यांनी केला.

“मी १७ जानेवारीला माहिती अधिकाराखाली अर्ज केला होता. प्रश्न काय तर खुर्चीवर का बसवलं.  मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मी कागदपत्रांची पडताळणी करून आलोय. ग्रामविकास मंत्रालय आणि इतर ठिकाणी त्यांनी केलेली कागदपत्रांची पडताळणी करून आलो, या सर्व ठिकाणी मला खुर्ची देण्यात आली होती, त्या सर्वांना तुम्ही नोटीस पाठवणार का,” असा सवाल यावेळी सोमय्यांनी केला.