किरीट सोमय्यांना दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने नोटीस पाठवली होती. या प्रकरणावर त्यांनी आज पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मंत्रालयाला दिले आहेत. पण मुख्यमंत्रीसाहेब मी वाट पाहतोय की मंत्रालयात माहिती अधिकाराच्या अवलोकनासाठी गेलेल्या किरीट सोमय्यावर तुम्ही गुन्हा कधी दाखल करताय ते. तुम्ही दिलेले आदेश मंत्रालय पाळत नाही. माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरेंना आव्हान आहे की तुमच्यात हिम्मत असेल तर एफआयआर दाखल करा,” असं किरीट सोमय्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“फक्त एका फोटोसाठी मुख्यमंत्री माझ्यावर गुन्हा दाखल करायला सांगत आहेत. दोष काय तर मी खुर्चीवर बसलोय. दोन कर्मचारी माझ्या सेवेत आहे. उद्धव ठाकरे जे खोटं बोलले ती चोरी मी पकडली, त्याचा राग त्या कर्मचाऱ्यांवर ते काढत आहेत. एका गरीब टायपिस्ट लिपीकाला तुम्ही नोटीस देताय. बाळासाहेब ठाकरे कुठे आणि हे मुख्यमंत्री बघा. राजकीय भ्रष्टाचार तुम्ही करताय, लढाई करायची आहे तर माझ्याशी करा, माझ्यावर कारवाई करा, त्या गरीब लिपीकाला नोटीस पाठवताना मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला. मुख्यमंत्र्यांना त्या लिपीकाच्या कुटुंबाची माफी मागावी लागणार,” असं ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackrey should be ashamed kirit somayya slams cm hrc
First published on: 27-01-2022 at 14:43 IST