मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विषयक सल्ला, मार्गदर्शन, प्रशिक्षण, तंत्रज्ञानाबाबतची माहिती, निर्यात वृद्धी, विविध कृषी योजना आणि हवामान बदलाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी निवृत्त सनदी अधिकारी उमेशचंद्र सारंगी यांची एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.सारंगी यांची समिती पीक उत्पादन, खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापनाबाबत सल्ला, अधिकारी, कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी, शेतकरी प्रशिक्षण.

कृषी विभागाच्या बंद प्रयोगशाळा पुन्हा कार्यान्वित करणे. कृषी विभागाच्या पायाभूत सोयी – सुविधांचा कार्यक्षमतेने वापर करणे, शेतीमाल निर्यातीला चालना देणे, शेतीमाल विक्रीतील मध्यस्थांची साखळी कमी करणे, हवामान बदल अनुकूल शेतीसाठी मार्गदर्शक सूचना देण्याचे काम समिती करणार आहे. समितीचा कार्यकाळ चार महिने असून, त्यासाठी सहा लाख रुपये मानधन दिले जाणार आहे.