विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत अनिश्चितता कायम आहे. आज विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. विधानसभेच्या कामकाजात अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा उल्लेख जरी नसला तरी ही निवडणुक राज्य सरकार घेऊ शकते. असं असलं तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून निवडणुकीला अजुनही अनुमती मिळालेली नाही. तेव्हा राज्य सरकार हे राज्यपालांच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत आहे. त्यापेक्षा राज्य सरकार नंतर काय पाऊल उचलते, निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

“जे लोकसभेत नियम आहेत त्याच आधारावर विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणुक होत आहे. आम्ही पाठवलेला प्रस्ताव राज्यपालांनी स्विकारायला पाहिजे असं वाटतं. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणुक घेण्याबाबत अजुन काहीही निर्णय झालेना नाही, बैठक घेत आहोत, जो चांगला असेल तो निर्णय घेऊ. राज्य सरकार आणि राज्यपाल असा कोणताही संघर्ष नाही”,अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते, मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

राज्यपाल-सरकार संघर्ष तीव्र ; राज्यपालांच्या अनुमतीविना विधानसभाध्यक्ष निवडणूक घेण्यासाठी चाचपणी

शेवटच्या दिवशी विधिमंडळाच्या कामकाजात भरपूर विषय आहेत, अनेक बिलं संमत व्हायची असून विरोध पक्षांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर राज्य सरकारकडून उत्तर येणे अपेक्षित आहेत. तेव्हा संभाव्य विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर शेवटचा दिवस हा आणखी वादळी ठरणार हे निश्चित.