सागरी जैवविविधतेच्या अभ्यासातून जगातल्या सर्वात मोठ्या कोरल रिफ्ट म्हणजेच प्रवाळ क्षेत्राची माहिती जगाला ज्ञात झाली आहे. आग्नेय आशियात समुद्राखाली हा मोठा प्रवाळ प्रदेश आहे. कोरल ट्रायँगल असे या क्षेत्राला संबोधले जाते. ॲमेझॉनच्या जंगलाइतकाच हा प्रवाळाचा भाग अवाढव्य आहे. ७६४ कोरल प्रजाती आणि तीन हजारांहून अधिक प्रकारच्या माशांच्या जाती या कोरल ट्रायँगल भागात आहेत.  

प्रवाळ म्हणजे काय?

कोरल म्हणजेच प्रवाळ हे एका जागी स्थिर असणारे अपृष्ठवंशीय सागरी सजीव असतात. प्रवाळ हे समुद्राच्या भूभागावर चिकटून असतात. समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून मिळणाऱ्या कॅल्शिअम कार्बोनेटपासून हे प्रवाळ एक बाह्यकवच बनवतात. समुद्राच्या तळाशी मुक्त विहार करणारे कोरल म्हणजेच प्रवाळ त्यांच्या लाळेतून तेथील खडकांवर कॅल्शिअम कार्बोनेट सोडतात आणि त्यापासून प्रवाळाच्या बाहेरचे संरक्षित आवरण तयार होते.  त्याच्या आत त्यांचे मऊ, पिशवीसारखे शरीर असते. शैवाल आणि झूप्लँक्टन्स (एकपेशीय सजीव) हे त्यांचे खाद्य असते. शैवाल आणि प्रवाळ हे एकमेकांवर अवलंबून असतात. ही परिसंस्था तशी गुंतागुंतीची मानली जाते. हे प्रवाळ दिसायला अत्यंत सुंदर असते. प्रवाळाचे प्राणिसंस्थेला आणि पर्यायाने मानवाला अनेक फायदे आहेत. प्रवाळ क्षेत्रामुळे माशांच्या अनेक प्रजातींना प्रजननासाठी सुरक्षित जागा मिळते. तीव्र लाटा, चक्रीवादळांपासून संरक्षण मिळते. प्रवाळांमुळे माशांची पैदास तर वाढतेच पण ज्या ठिकाणी समुद्रात खोलवर प्रवाळांचे प्रमाण अधिक त्या समुद्र किनाऱ्यांना चक्रीवादळाचाही तडाखा कमी बसतो. प्रवाळांमध्ये औषधी गुणधर्म असल्याचेही सिद्ध झाले आहे.

researchers at iit bombay suggested measures to deal with future economic crises
नैसर्गिक आपत्तीमुळे भविष्यात आर्थिक संकट; आयआयटी मुंबईने सुचविल्या उपाययोजना
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
News About Elephants
Elephants : प्राणीसंग्रहालयातून मुक्ती मागण्याचा हत्तींना कायदेशीर अधिकार नाही; अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
Ashutosh Joshi Konkan Nature Raigad
…एक पत्थर तो तबियत से उछालो यारो
biggest iceberg in the world
जगातील सर्वांत मोठा हिमखंड ‘या’ बेटावर धडकणार? याचे परिणाम किती विध्वंसक?
forest lands latest news in marathi
वनहक्क जमिनी दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने धनदांडग्यांच्या घशात
only district in India divided between two states
‘हा’ आहे दोन राज्यांमध्ये विभागला गेलेला भारतातील एकमेव जिल्हा! एकाच जिल्ह्यातील रहिवाशांवर दोन्ही राज्यांच्या प्रशासनाचे असते नियंत्रण
Fossils of single celled organisms
कुतूहल : एकपेशीय सजीवांचे जीवाश्म

हेही वाचा >>>माणसांमध्ये वेगाने पसरतोय ‘रॅबिट फिव्हर’; काय आहे हा विचित्र आजार? त्याची लक्षणे काय?

सागरी अॅमेझॉनची व्याप्ती किती?

कोरल म्हणजे प्रवाळ प्रदेश. आग्नेय आशियात समुद्राखाली असा मोठा प्रवाळ प्रदेश आहे. हा इतका मोठा आहे की तो सहा देशांना जोडतो. फिलिपाइन्स, इंडोनेशिया, मलेशिया, पापुआ न्यू गिनी, सॉलोमन आयलंड आणि तिमोर लॅस्ते या देशांभोवतीच्या महाकाय समुद्री भागात खोलवर हा प्रवाळ प्रदेश आहे. याला समुद्राचे अॅमेझॉन असेही म्हटले जाते. अॅमेझॉनच्या जंगलाला जसं जगाचं फुफ्फुस म्हटले जाते,  तसाच हा प्रवाळ प्रदेश आपल्या जैवविविधतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा भाग सुमारे ५७ लाख चौ. कि.मी. इतका अवाढव्य पसरलेला आहे. येथे सागरी जैवविविधता खूप मोठ्या प्रमाणावर आढळून येते. जगभरात आढळणाऱ्या एकूण प्रवाळ परिसंस्थेच्या ७६ टक्के परिसंस्था या एका त्रिभुज भागात आहे. यातून या प्रदेशाचे महत्त्व लक्षात यावे. या परिसंस्थेवर सुमारे १२ कोटी लोक उपजिविकेसाठी अवलंबून आहेत.

हेही वाचा >>>विश्लेषण: ‘एचएमपीव्ही’चा धोका वाढतोय?

दुर्मीळ जलसंपदेचे अस्तित्व धोक्यात

मासेमारीचे प्रमाण वाढले आहे. जल प्रदूषण वाढत आहे. पाण्यातील कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वाढू लागले आहे त्यामुळे पाण्याचे आम्लीकरण होत आहे. पाण्याचे तापमान वाढत आहे. पाण्याचे तापमान वाढले की त्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. तेल आणि वायू काढण्याचे प्रकल्प येथे मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित आहेत. त्यामुळे ध्वनिप्रदूषण होत आहे. थोडक्यात मानवी हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे येथील प्रवाळ आणि अन्य दुर्मीळ जलसंपदा नष्ट होऊ लागली आहे.

भारतात किती प्रवाळ प्रदेश आहेत?

भारतात चार प्रवाळ भित्तीक्षेत्रे आहेत. मन्नारचे आखात, अंदमान आणि निकोबार द्वीप समूह, लक्षद्वीप समूह, कच्छचे आखात आणि मालवणात प्रवाळ भित्ती आहेत. भारतात तुलनेच प्रवाळ क्षेत्र कमी आहे. बंगालच्या उपसागरात नद्यांद्वारे गोडे पाणी येते त्यामुळे तेथे प्रवाळ कमी आहे. भारतात प्रवाळ संरक्षणासाठी विविध कायदेही आहेत. 

Story img Loader