भाजपचे आज शक्तिप्रदर्शन

जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे

(संग्रहीत छायाचित्र)

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या गुरुवारपासून सुरू होणाऱ्या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर केलेले आवाहन आणि शिवसेनेकडून होत असलेला विरोध लक्षात घेऊन भाजपकडून प्रत्युत्तराची तयारी करण्यात आली आहे.

राणे यांचे गुरुवारी सकाळी १० वाजता मुंबई विमानतळावर आगमन होणार असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, दादर येथील चैत्यभूमी, सावरकर स्मारक व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन राणे अभिवादन करतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Union minister narayan rane jan ashirwad yatra demonstration of strength from bjp akp

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या