scorecardresearch

आर्थर रोड तुरुंगात कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार

देशातील संवेदनशील तुरुंगापैकी एक असलेल्या आर्थर रोड तुरुंगात एका १९ वर्षीय कैद्याने २० वर्षीय कैद्याला मारहाण करून अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार रविवारी घडला.

मुंबई :  देशातील संवेदनशील तुरुंगापैकी एक असलेल्या आर्थर रोड तुरुंगात एका १९ वर्षीय कैद्याने २० वर्षीय कैद्याला मारहाण करून अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार रविवारी घडला. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे तुरुंगाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आर्थर रोड तुरुंग देशातील संवेदनशील तुरुंगांपैकी एक असून येथे संघटित गुन्हेगारी टोळय़ांशी संबंधित गुन्हेगार, मोठय़ा आर्थिक गुन्ह्यांमधील आरोपींना ठेवण्यात आले आहे. याशिवाय सक्तवसुली संचलनालयाने अटक केलेले राज्य सरकारमधील दोन राजकीय नेतेही याच तुरुंगात आहेत.

या तुरुंगात रविवारी मध्यरात्री  एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले. या तुरुंगातील ‘सर्कल १’मध्ये हा प्रकार घडला. एकाच बरॅकमध्ये असलेल्या १९ वर्षीय कैद्याने २० वर्षीय कैद्याला बेदम  मारहाण केली, त्यानंतर बळजबरीने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला व याची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. सोमवारी सकाळी या पीडित कैद्याने घडलेला प्रकार कारागृहातील पोलिसांना सांगितला. कारागृह अधिकाऱ्यांनी तात्काळ आरोपी कैद्याला ताब्यात घेऊन ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याला माहिती दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Unnatural torture arthur road prison inmate sensitive prisoners beating ysh

ताज्या बातम्या