scorecardresearch

व्हर्चुअली वाईल्ड’च्या चौथ्या भागाचे अनावरण

जागतिक चिमणी दिवस (२० मार्च) व जागतिक वन दिन (२१ मार्च) यांचे औचित्य साधून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या व्हर्चुअली वाईल्ड या आभासी सफर मालिकेतील चौथ्या भागाचे अनावरण सोमवारी अतिरिक्त पालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या हस्ते करण्यात आले.

मुंबई : जागतिक चिमणी दिवस (२० मार्च) व जागतिक वन दिन (२१ मार्च) यांचे औचित्य साधून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या व्हर्चुअली वाईल्ड या आभासी सफर मालिकेतील चौथ्या भागाचे अनावरण सोमवारी अतिरिक्त पालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्यान व प्राणिसंग्रहालय परिसरामध्ये जमा होणाऱ्या पालापाचोळय़ापासून गांडूळ खतनिर्मिती केली जाते. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या शतकोत्तर अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हे खत आता नागरिकांना खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) रमाकांत बिरादार, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, प्राणिसंग्रहालयाचे संचालक संजय त्रिपाठी, उपअधीक्षक (पशुवैद्यकीय) डॉ. कोमल राऊळ तसेच प्राणिसंग्रहालयाचे अधिकारी, कर्मचारी, कामगार उपस्थित होते. या आभासी मालिकेचे सर्व भाग ‘द मुंबई झू’ ह्या यूटय़ूब चॅनेलवर पाहता येतील.

दरम्यान, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय १९ नोव्हेंबर १८६२ रोजी नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी या ऐतिहासिक घटनेला तसेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाला १६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा शतकोत्तर हीरक महोत्सव वर्षभर वेगवेगळय़ा कार्यक्रमातून साजरा करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Unveiling fourth installment the zoos virtual wild jijabai bhosle udyan amy

ताज्या बातम्या