उत्तर प्रदेशात भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक यशात दलित मतदारांचा वाटा मोठा आहे. रिपाईने भाजपला उत्तर प्रदेशात पाठिंबा दिला होता, याची आठवण केंद्रीय राज्यमंत्री व रिपाइचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपला करून दिली आहे.

उत्तर प्रदेशातील विजयानंतर विरोधकांनाही धक्का बसला. ते सुद्धा मोदींचे अभिनंदन करीत आहेत. मोदी लाट असल्याचे अनेकांनी मान्य केले आहे. दलित मतदारांनी बहुजन समाज पार्टीला नाकारले आहे. समाजवादी आणि काँग्रेसचाही दारुण पराभव झाला आहे. दलित मते भाजपला मिळाल्यानेच त्यांना महायश प्राप्त झाले आहे. उत्तर प्रदेशातील निकालानंतर आठवले यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशात दलित मतदारांचा कौल महत्त्वपूर्ण असतो, यावेळीही तो महत्त्वपूर्ण ठरला. रिपाइंने दलित मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले होते.