अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा भाचा आरिफ याला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. फूटपाथवरील एका चहाच्या टपरीसमोर उभा राहून तो चहा पित होता. तेवढ्यात उत्तर प्रदेश पोलिसांच्या एका पथकाने धाड मारली आणि आरिफला पकडलं. फरार माफियांच्या यादीत आरिफचं नाव समाविष्ट केल्यापासून तो उत्तर प्रदेश पोलिसांच्या रडारवर होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी देशात अनेक ठिकाणी छापेमारी केली. पण तो हाती लागला नव्हता. अखेर तो मुंबईत पोलिसांच्या हाती लागला.

उत्तर प्रदेश पोलिसांनी आरिफला वांद्रे हिल रोडजवळ पकडलं. पोलीस गेल्या अनेक महिन्यांपासून आरिफच्या शोधात होता. पोलिसांना चकमा देत तो मुंबईत पोहोचला आणि काही दिवसांपासून तो मुंबईतचं राहात होता.

chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांचं एक पथक वांद्रे येथे दाखल झालं. आरिफ एका रस्त्याकडेला फूटपाथवर चहा पित होता. त्याला पकडायला आलेला पोलीस खाकी गणवेशात नव्हते. सर्वच पोलीस हे साध्या कपड्यांमध्ये होते. जेणेकरून आरिफला पोलिसांच्या या ऑपरेशनबद्दल सुगावा लागू नये आणि तो तिथून पळून जाऊ नये. आरिफला पकडतानाचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत स्पष्ट दिसतंय आरिफ चहाच्या दुकानासमोर उभा आहे. पोलीस तिथे येतात आणि ते आरिफला अगदी सहज पकडून नेतात.

हे ही वाचा >> “२०२४ मध्ये मोदींचं सरकार येईल आणि आपण…”, खासदार कुमार केतकरांनी काँग्रेसच्या लेट लतिफ नेत्यांचे कान टोचले

माफिया अतिक अहमद आणि अशरफच्या हत्येनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी सध्या फरार आरोपींना शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी आज अबू सालेमचा भाचा आरिफला अटक केली आहे.