पिण्याचे पाणी, मोबाइल चार्जिंग, स्तनपान कक्ष, पेय पदार्थ यासह ‘एटीएम’ची सुविधा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर जकात नाक्याजवळ अद्ययावत सोयी – सुविधांनीयुक्त सार्वजनिक प्रसाधनगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रसाधनगृहात स्त्री, पुरुष, तृतीय पंथीयांसह दिव्यांगांसाठी स्वतंत्र शौचालय, सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, बाळांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष, बाळांचे डायपर बदलण्यासाठी जागा, पिण्याच्या पाण्याची सोय, मोबाइल चार्जिंग आणि पेय पदार्थांसह एटीएमची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रसाधनगृहाच्या छतावर सौरऊर्जा संयंत्र बसविण्यात येणार असून त्यापासून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबई सुशोभीकरण प्रकल्प राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून दहिसर (पूर्व) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर १२ हजार ९१६ चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेत सर्व सोयींनीयुक्त सार्वजनिक प्रसाधनगृहाची उभारणी करण्यात येणार आहे. या अद्ययावत प्रसाधनगृहामध्ये स्त्री, पुरुष तसेच तृतीय पंथीय, दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी स्वतंत्र शौचालये, सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, बाळांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष, बाळांचे डायपर बदलण्यासाठी जागा आदी सुविधा असणार आहेत. पिण्यासाठी शुद्ध पाणी, मोबाइल चार्जिंग, एटीएमची सुविधा यामध्ये प्रस्तावित आहे. या ठिकाणी चहा, कॉफीची व्यवस्था असणार आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्यासह सभोवतालच्या जागेवर रंगीत फुलांची झाडे लावण्यात येणार आहेत. पुरूषांसाठी पाच शौचकूप, महिलांसाठी पाच शौचकूप आणि दिव्यांगांसाठी एक शौचकूप यामध्ये समाविष्ट असेल, अशी माहिती ‘आर उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त नयनीश वेंगुर्लेकर यांनी दिली.

new phase of Samruddhi Highway, bharvir, igatpuri, Monday
समृद्धी महामार्गाचा आणखी एक टप्पा सोमवारपासून सेवेत, आता इगतपुरीपासून थेट…
Mumbai Pune Expressway The area near Khalapur toll plaza will be free of traffic congestion Mumbai news
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग: खालापूर पथकर नाक्याजवळील परिसर वाहतूक कोंडीमुक्त होणार
Ajni Chowk
नागपूर : पाच रस्ते, मेट्रोस्थानकामुळे अजनी चौक ‘अपघातप्रवण’! नीरीच्या नियोजित जागेवर मेट्रो स्थानक न बांधल्याचा फटका
Nagpur-Nagbhid Railway
व्याघ्रप्रकल्पातून जाणाऱ्या रेल्वेमार्गाला अखेर परवानगी, नागपूर-नागभीड रेल्वेमार्गातील अडथळा दूर

हेही वाचा >>>शरद पवारांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सौर ऊर्जा निर्मितीच्या दृष्टीने या प्रसाधनगृहाच्या छतावर सौर ऊर्जाचे पॅनल बसविण्यात येणार आहे. या पॅनलमधून विजेची निर्मिती होणार आहे. ही वीज विद्युतपुरवठा कंपनीला देण्यात येणार असून त्यामुळे प्रसाधनगृहाच्या मासिक खर्चात बचत होईल. पावसाचे पाणी पुनर्भरण / संचयन करण्याची तजवीज केली जाणार आहे.

हेही वाचा >>>जीवे मारण्याची धमकी आल्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले…

मुख्य रस्ते व द्रुतगती महामार्गावर प्रसाधनगृहाची सुविधा पुरेश्या प्रमाणात उपलब्ध झाली तर नागरिकांची सोय होईल, या उद्देशाने या सार्वजनिक प्रसाधनगृहाची उभारणी करण्यात येणार आहे. घनकचरा विभागामार्फत त्याची दैनंदिन स्वच्छता व देखरेख करण्यात येणार आहे. कार्यादेश दिल्यानंतर १२ महिन्यांत या प्रसाधनगृहाचे बांधकाम पूर्ण होईल, असेही महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.