पिण्याचे पाणी, मोबाइल चार्जिंग, स्तनपान कक्ष, पेय पदार्थ यासह ‘एटीएम’ची सुविधा
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर जकात नाक्याजवळ अद्ययावत सोयी – सुविधांनीयुक्त सार्वजनिक प्रसाधनगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रसाधनगृहात स्त्री, पुरुष, तृतीय पंथीयांसह दिव्यांगांसाठी स्वतंत्र शौचालय, सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, बाळांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष, बाळांचे डायपर बदलण्यासाठी जागा, पिण्याच्या पाण्याची सोय, मोबाइल चार्जिंग आणि पेय पदार्थांसह एटीएमची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रसाधनगृहाच्या छतावर सौरऊर्जा संयंत्र बसविण्यात येणार असून त्यापासून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबई
हेही वाचा >>>शरद पवारांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
सौर ऊर्जा निर्मितीच्या दृष्टीने या प्रसाधनगृहाच्या छतावर सौर ऊर्जाचे पॅनल बसविण्यात येणार आहे. या पॅनलमधून विजेची निर्मिती होणार आहे. ही वीज विद्युतपुरवठा कंपनीला देण्यात येणार असून त्यामुळे प्रसाधनगृहाच्या मासिक खर्चात बचत होईल. पावसाचे पाणी पुनर्भरण / संचयन करण्याची तजवीज केली जाणार आहे.
हेही वाचा >>>जीवे मारण्याची धमकी आल्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले…
मुख्य रस्ते व द्रुतगती महामार्गावर प्रसाधनगृहाची सुविधा पुरेश्या प्रमाणात उपलब्ध झाली तर नागरिकांची सोय होईल, या उद्देशाने या सार्वजनिक प्रसाधनगृहाची उभारणी करण्यात येणार आहे. घनकचरा विभागामार्फत त्याची दैनंदिन स्वच्छता व देखरेख करण्यात येणार आहे. कार्यादेश दिल्यानंतर १२ महिन्यांत या प्रसाधनगृहाचे बांधकाम पूर्ण होईल, असेही महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.