scorecardresearch

Premium

गर्भाशयाच्या फायब्रॉईड्समुळे करावा लागतोय वंध्यत्वाचा सामना!

लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला…

Uterine fibroids are causing infertility
डॉक्टरांनी दिला काळजी घेण्याचा सल्ला

संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई – दिवसेंदिवस वंध्यत्वाची समस्या वेगाने वाढत आहेत. प्रजनन वयोगटातील स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्यापैकी बहुतांश महिलांना गर्भाशयाच्या फायब्रॉइड्सची समस्या सतावताना दिसते. गर्भाशयाचे फायब्रॉइड्स ही गर्भाशयाचा कर्करोग नसलेली वाढ आहे जी प्रजनन आरोग्याच्या समस्येस कारणीभूत ठरते. साधारणपणे दररोज रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या १० महिलांपैकी दोन महिलांना फायब्रॉईडसची समस्या असल्याचं समोर आले आहे.

Vitamin D Deficiency
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
icmr study said indians salt intake 3 percent higher What can you do to reduce salt daily quota
भारतीयांकडून मिठाचे अतिसेवन : आहारातून मीठ कमी करण्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेले ‘हे’ उपाय करा फॉलो
accurate diagnosis of gallbladder cancer
आरोग्य वार्ता : कृत्रिम बृद्धिमत्तेच्या मदतीने पित्ताशयाच्या कर्करोगाचे अचूक निदान
respiratory illness & mental condition
Health Special: श्वसनसंस्थेचे विकार आणि मानसिकता

आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी केलेला अभ्यास आणि वैद्यकीय अहवालांनुसार १८ ते ३५ वयोगटातील तरुण स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या फायब्रॉइड्सचे प्रमाण वाढले आहे. यात तीव्र वेदना, मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव आणि काही प्रमाणात प्रजनन समस्या उद्भवू शकते. गर्भाशयाच्या फायब्रॉइड्समुळे स्त्रीच्या गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांसाठी ही एक चिंतेची बाब ठरत असल्याचे स्त्रीरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दीर्घकालीन प्रजनन समस्या टाळण्यासाठी वेळीच निदान आणि उपचार करणे गरजेचे आहे. महिलांना मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होणे, ओटीपोटात वेदना होणे किंवा गर्भधारणेच अडचणी येणे यासारखी लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा असे ठाणे जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्रेया शेळके यांनी सांगितले.

अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. केकिन गाला यांनी म्हटले की, वंध्यत्वाची अनेक कारणे आहेत ज्यात पीसीओएस, वाढते वय, स्त्रीबीज कमी होणे इत्यादी. फायब्रॉइड्समुळे अनेकदा यशस्वी गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात. त्यामुळे गर्भधारणेत अधिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही गरोदर राहण्याचा प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला फायब्रॉइड्सची समस्या असेल तर डॉक्टर किंवा वंध्यत्व निवारण तज्ञ तुम्हाला यामध्ये मदत करू शकतात. फायब्रॉइड्स असलेल्या महिलांना त्वरीत उपचार घेता येतात मात्र यासाठी महिलांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.

गर्भाशयातील सिस्ट्समुळे बर्याचदा अधिक रक्तस्त्राव होणे, ओटीपोटात वेदना होणे आणि अनियमित मासिक पाळीची समस्या सतावते, लैंगिक संभोगाच्या वेळी ओटीपोटात असह्य वेदना होतात,पाठदुखी, गर्भधारणेत अडचणी येणे आणि गर्भपात ही देखील गर्भाशयाच्या फायब्रॉइडची लक्षणे आहेत. हल्ली २५ ते ३० वयोगटातील महिलांमध्ये गर्भाशयाच्या फायब्रॉइड्सचे प्रमाण दिसून येते.

गर्भाशयाच्या फायब्रॉइड्सचे निदान झालेल्या तरुणींच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ दिसून येत आहे. ज्यामुळे त्यांच्या भविष्यातील प्रजननक्षमतेबवर परिणाम होऊ शकतो असे लीलावती रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. किरण कोएल्हो यांनी सांगितले. याला पर्यावरणीय घटकही तितकेच कारणीभूत ठरतात, कारण काही प्रदूषक आणि रसायनांच्या संपर्कात आल्याने लहान वयातच फायब्रॉइड विकसित होऊ शकतात. फायब्रॉइड्स हे फॅलोपियन ट्युब ब्लॅाक करतात, ज्यामुळे शुक्राणूंना स्त्रीबाजापर्यंत पोहोचणे आणि स्त्रीबीज फलित करणे अवघड होते. या विकृती स्त्रीच्या नैसर्गिकरित्या गर्भधारणेच्या क्षमतेमध्ये अडथळा आणू शकतात आणि गर्भपाताचा धोका निर्माण करु शकतात. गर्भाशयाच्या फायब्रॉइड्समुळे तरुण मुलींमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत आहे. १५ वर्षावरील मुलींनी नियमितपणे स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि त्यांच्या प्रजनन आरोग्याविषयी जाणून घेणे ही काळाची गरज असल्याचे डॉ किरण म्हणाल्या..

काही स्त्रियांमध्ये हार्मोन्सच्या परिणामामुळे गर्भाशयाच्या स्नायूंच्या ऊतींची वाढ होते आणि त्यामुळे फायब्रॉइड्स तयार होतात. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या १० पैकी दोन महिलांना फायब्रॉइड्सची समस्या आढळून येते. रजोनिवृत्तीनंतर ते आकाराने लहान होतात. त्याचप्रमाणे, जेव्हा शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण जास्त असते तेव्हा गर्भधारणेदरम्यान त्यांचा आकार वाढतो. त्यामुळे महिन्यातून दोनदा मासिक पाळी येणे, जास्त रक्तस्त्राव, वेदनादायक मासिक पाळी, लघवी करण्यास त्रास होणे, वारंवार लघवी होणे ही लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करताडॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर्व फायब्रॉइड्सना शस्त्रक्रियेची गरज नसते असे झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. माधुरी मेहेंदळे यांनी सांगितले.

जे. जे. रूग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रिती लुईस म्हणाल्या की, महिलांमध्ये गर्भाशयातील फाइबॉईडची समस्या वाढताना दिसून येत आहे. परंतु, महिला अनेकदा याकडे दुर्लक्ष करतात. मासिक पाळी दरम्यान अतिरिक्त रक्तस्त्राव जाणवू लागल्यानंतर डॉक्टरांकडे येतात. त्यानंतर सोनोग्राफी चाचणीत गर्भाशयात गाठी असल्याचं निदान होता. गर्भाशयात फायब्रॉईड असणाऱ्या साधारणतः ३-४ महिला बाह्यरूग्ण विभागात उपचारासाठी आलेल्या दिसून येत आहेत. या फायब्रॉईडमुळे वंधत्व येत नाही. मात्र अकाली प्रसूती आणि गर्भपात होण्याचा धोका सर्वांधिक असतो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uterine fibroids are causing infertility doctors advise against ignoring symptoms scj

First published on: 20-09-2023 at 18:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×